जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

0

जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाणेकामी शासनाकडून प्राधिकृत यंत्रणेकडून परवानगी देण्यात आलेली आहे. अशा परवानगी प्राप्त नागरिक पर जिल्ह्यांतून व परराज्यातून जळगाव तालुक्यात येणार आहे. अशा नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिल्याबरोबर त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांशी किंवा अन्य नागरिकांशी संपर्क येण्यापूर्वीच त्यांना कॉरन्टाईन ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी जळगाव महानगरपालिकाक्षेत्र व संपूर्ण तालुकाक्षेत्रासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी संतोष वाहुळे, उपायुक्त, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9922334478, विकास पाटील, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9403686210 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव तालुका ग्रामीण क्षेत्रासाठी जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शशिकांत सोनवणे, भ्रमणध्वनी क्रमांक-9158484638, जळगाव तालुका आरोग्य अधिकारी, संजय चव्हाण, भ्रमणध्वनी क्रमांक-9373393777, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, पंचायत समिती, जळगाव श्रीमती. सुधा गिंधेवार, भ्रमणध्वनी क्रमांक-9403102459 या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.

नागरिकांनी अथवा माहितगारांनी आपल्या भागात कोणी बाहेर जिल्ह्यातून, परराज्यातून आले असल्यास  या अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here