चाळीसगांव तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा उपचारा दरम्यान मृत्यु

0

चाळीसगांव – शिंदी ता. चाळीसगांव येथील इंडियन टीबीटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मधील जवान संभाजी धर्मा पानसरे वय 31 यांचे दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथे उपचार दरम्यान निधन झाले. ते 2011 मध्ये नाशिक येथे भर्ती झाले होते. उत्तराखंड येथे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर ते छत्तीसगड येथे देश सेवा करीत होते. ते नुकतेच 4 जानेवारी रोजी एक महिन्याची सुटीवर आले होते. त्यांना पोटाचा अचानक त्रास होत असल्याने त्यांना दिनांक 14 रोजी शहरातील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती जास्त खालवल्याने त्यांना दिनांक 18 रोजी पुढील पुचारासाठी नाशिक येथील संकल्प हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु तेथेही त्यांना उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही आणि तेथेच दिनांक 26 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या मूळगावी शिंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचा पश्चात पत्नी, तीन वर्षाची एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. ते एस, टी, परिवहन मंडळातील सेवा निवृत्त कर्मचारी धर्मा महादू पानसरे यांचे चिरंजीव तर देविदास धर्मा पानसरे यांचे लहान बंधू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here