अंभई येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी सर्व समाजातील लोकांकडून लोकवर्गणी जमा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे )अंभई येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी सर्व समाजातील लोकांकडून लोकवर्गणी जमा करून केली” बांधकामास सुरुवात अंभई हे मोठे बाजारपेठेचे गावं आहे व येथे फार पूर्वीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुर्णाकृती पुतळा आहे सदरील पुतळ्याच्या वट्याला तडा गेला असल्याने त्याच्या दुरूस्ती साठी गावातील सर्व समाजातील लोक व बौद्ध समाज बांधव येकत्र येऊन स्वैचछने लोकवर्गणी जमा केली व काम दुरुस्तीस प्रारंभ केला यावेळी ग्रा.प. सदस्य जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ग्रा. प. सदस्य संतोष हिरे, सोसायटी संचालक दशरथ सोनावणे, डॉ. जुनेद देशमुख, संजय पा. दुतोंडे, गंगाधर दांडगे,शेषराव काजळे, मोहसीन एफ देशमुख, रवी गव्हाणे, कैलास हिरे, वसीम शेख, अजीम सय्यद, कडूबा सोनावणे, बाबू दांडगे, पंडित सुरडकर,राजू सुरडकर, मधुकर मोरे, श्रीपत वाघ, संजय अहिरे, संजय सोनवणे, भास्कर देहाडे, आकाश सुरडकर, रवी सोनावणे समाधान भूईगळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here