सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीने अनेक शेतक-यांच्या शेतजमीनी पाण्याखाली गेल्यामुळे शेतजमीनीला तलावाचे स्वरूप आले आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी लक्ष्मण जयाजी सोनवणे यासह आदी शेतक-यांची वडाळा शिवारात गट नं.३४ मध्ये १ हेक्टर ४० आर जमीन आहे.गट नं.३६ मधील नालाबिल्डींगखालील गट नंबर ३४ मधील शेतक-यांच्या शेतजमिनीचे व पिकाचे नुकसान झालेले आहे.या अगोदर २०१५ मध्ये गट नंबर ३४ मधील शेतक-यांचे अशाच प्रकारे नुकसान झाल्यामुळे संबंधित शेतक-यांनी तात्पुरता मातीचा भराव टाकुन दुरूस्ती केली होती.सदरील भराव टाकण्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात दमदार पावसामुळे नालाबिल्डींग फुटून त्या खालील गट नंबर ३४ मधील शेतजमीन पिकासहीत खगाळुन वाहुन गेल्याने सदरील शेतजमीन नापीक झाली आहे.
तरी माननीय तहसीलदार साहेबांनी संबंधित नालाबिल्डींगमुळे नापीक झालेल्या शेतजमीनीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी वडाळा येथील शेतकरी लक्ष्मण नबाजी गव्हाणे, सुरेश गंगाधर गव्हाणे,योगेश गंगाधर गव्हाणे,ञ्यंबक जयाजी गव्हाणे यांनी निवेदन दिलेले आहे.