
सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या सपकाळ वस्ती व गोकुळ वाडी येथील अंगणवाडीचे बांधकाम हे निकृष्ठ झालेले आहे.या कामाची चौकशी करावी तसेच अंदाजपञकाप्रमाणे सुधारीत काम करावे अशी मागणी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे संभाजी ब्रीगेडच्या वतीने करण्यात आली आहे.अधिकारी व गुत्तेदाराने संगनमत करून थातुरमातुर कामे केली आहेत अशी तक्रार संभाजी ब्रिगेडियर तालुका अध्यक्ष विजय पवार,जिल्हा उपाध्यक्ष राजु बगुरे यांनी दिलेल्या निवेदनात केलेली आहे.
