खिर्डी ता रावेर-रावेर तालुक्यातील धामोडी येथे दि १ रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास जुन्या किरकोळ वादामुळे येथे दोन गटात हाणामारी झाली असून याचे रूपांतर दगडफेकीत झाले होते.दोन्ही गटाकडून दोन वेगवेगळ्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आले आहे. पहिली फिर्यादीत फिर्यादी विनोद जगन्नाथ मेढे रा.धामोडी यांनी फिर्याद दिली की आरोपी योगेश वासुदेव पाटील,रत्नाकर वसंत महाजन,आकाश उर्फ सोनू संजय पाटील,गोपाळ वसंत महाजन,योगेश मधुकर पाटील,ठाकुलाल शांताराम पाटील,पवन पितांबर पाटील,प्रल्हाद दिनकर पाटील,धीरज संजय पाटील,संजय श्रावण पाटील,गोपाळ श्रवण पाटील,रमेश मोतीलाल पाटील,दिलीप वासुदेव पाटील,शरदाबाई श्रावण पाटील,सर्व राहणार धामोडी यांच्या विरोधात निंभोरा पोलिसांत भदावी कलम ३०७,२९५,१४३,१४४,१४७,१४८,१४९, ५०४,५०६,१८८,२६९,२७०,कोविड १९ चे नियम ११ चे उल्लंघन अ.जा.ज.का.कलम ३ (२)(५) ३ (१),३ (१०)महा.पो.अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.यात फिर्यादीच्या फिर्याद की दि.१ रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास धामोडी गावात आरोपींनी गैर कायद्याचे मंडळी जमवून हातात दगड विटा घेऊन तुम्हाला एकालाही जिवंत सोडणार नाही ,तुम्ही माजले आहे असे बोलून वाड्यातील लोकांवर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच हातातील दगड व विटा फेकून मारून त्यात फिर्यादी ची काकू वात्सलबाई संजय मेढे,हिस डोख्यास व टोपलु देवचंद मेढे, यांच्या पायास दुखापत करून आरोपी शरदाबाई श्रावण पाटील,व आकाश उर्फ सोनू संजय पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन जमावाने धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात आकाश संजय पाटील याचे फिर्यादीनुसार आरोपी जितेंद्र संजय मेढे,,अजय अरुण मेढे,ईश्वर किशोर मेढे,दीपक किशोर मेढे,किरण टोपलु मेढे,विशाल अनिल मेढे,विशाल विनोद मेढे,संजय कालिदास मेढे,सुरज विनोद मेढे,भूषण गौतम मोरे,शुभम टोपलु मेढे, प्रमोद राजधर मेढे,विनोद जगन्नाथ मेढे,सर्व राहणार धामोडी ता रावेर,यांच्यावर भदावी कलम ३०७,३२४,३२३,१४३,१४४,१४७,१४८, १४९,५०४,५०६,१८८,२६९,२७० व कोविड१९ चे नियम ११ चे उल्लंघन मा.पो.अधिनियम १५१ चे कलम ३७(१)(३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी ची फिर्याद की आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमून हातात दगड वीट घेऊन फिर्यादिस काल तुला कमी मार झाला असेल आता तुला व तुझ्या आजी शरदाबाई व काका गोपाळ पाटील यांना आम्ही वाड्यातून परत जाऊ देणार नाही व तंगळे तोडून टाकू व तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे बोलून शिवीगाळ करून फिर्यादिस जीवे ठार मारण्याचे टाकण्याचे उद्देशाने बाजूला पडलेल्या दगड वीट उचलून फेकून मारले तसेच आरोपी ईश्वर मेढे याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादी चे काका गोपाळ पाटील यांच्या पायावर ,हातावर मारहाण केली व इतर आरोपींनी दगड विटा फेकून मारल्या तसेच आरोपी जितेंद्र मेढे,अजय मेढे,ईश्वर मेढे,दीपक मेढे,विनोद मेढे,भूषण मोरे यांनी फिर्यादीच्या उजव्या डोळ्याखाली लोकांडी कडा व फाईटरने मारून दुखापत केली.म्हणून गुन्हा दाखल झाला.
या घटनेत दोघी गटातील वात्सलबाई संजय मेढे,टोपलु देवचंद मवढे,व आकाश संजय पाटील,गोपाळ श्रावण पाटील असे एकूण चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सदरील घडलेल्या घटनेची माहिती मिळतास फैजपूर उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे ,निंभोरा सा. पो.नि महेश जानकर,उप निरीक्षक योगेश शिंदे,निंभोरा पोलीस स्टाफ व जळगाव येथून आर.सी.पी चे दंगा पथक यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला.या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पो अधिकारी नरेंद्र पिंगळे,व निंभोरा पो.उप निरीक्षक योगेश शिंदे करीत आहे.
धामोडी गावात शांतता राखावी :- आ चंद्रकांत पाटील
धामोडी गावात सर्वांनी शांतता राखावी एकमेका बद्दल समज गैरसमज काढून घ्यावे असे आव्हान आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले या वेळी माजी जि प सदस्य रमेश पाटील,प.स.सदस्य दिपक पाटील,माजी जि. प.सदस्य आत्माराम कोळी,छोटू पाटील,राजू सावरणे,उमेश गाढे,गणेश चौधरी,आदी उपस्थित होते.