कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला सुखकर्ता फाऊंडेशन कडुन एरंडोल नगरपालिका कर्मचारी वर्ग ज्यात प्रामुख्याने सफ़ाई कामगार ,घंटागाडी कामगार ,कचरा वेचक कामगार , घन कचरा डेपो व फवारणी कामगार ह्यांना कोरोना विरोधी सरंक्षक साहित्याचे वाटप एरंडोल शहराचे लोक नियुक्त नगराघ्यक्ष रमेश परदेशी ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले …
दिनांक 30एप्रिल रोजी नपा च्या प्राग्नणात शारिरीक अंतर ठेऊन ,प्रातिनिधिक स्वरुपात ह्या साहित्याचे वाटप करण्यात आले .
ह्यात प्रामुख्याने फ़ेस शील्ड (चेहर्यावरील शिरस्त्राण) आणी N 95 मास्क चा समावेश आहे ….
आपल्या एरंडोल शहराचे आरोग्य ज्यांच्या हातात सुरक्षीत आहेत ते सफ़ाई कामगार स्वतः सुरक्षित राहिले पाहिजेत ! कारण कोरोनाचा धोका हा डॉक्टर ,नर्सेस,आरोग्य सेवक ,पोलीस बंधू ह्यांच्या इतकाच सफाई कामगार हयाना ही असल्यामूळे ह्या साहित्याची गरज त्याना ही आहे …..खरया अर्थाने ते कोरोना योद्धे आहेत .म्हणून कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला ही छोटीशी भेट नपा कामगाराना देत असल्याचे सुखकर्ता फाऊंडेशन चे डॉ.नरेंद्र ठाकूर (नगरसेवक ) ह्यांनी नमुद केले ….
लोकनियुक्त नगराध्यक्ष मान .रमेशभैय्या परदेशी ह्यांनी सुखकर्ता फाऊंडेशन च्या हया उपक्रमाचे कौतूक केले व त्याचबरोबर येत्या काही दिवसातच नपा कर्मचारी वर्गासाठी परिपूर्ण व प्रगत असे वैयक्क्तीक सुरक्षा कवच व इतर साहित्य उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले …त्याचप्रमाणे एरंडोल शहराने गेल्या दोन महिन्यापासून स्वच्छंता व साफसफाई कामात आघाडी घेतली असुन त्यास मुख्याधिकारी श्री किरण देशमुख व सर्व अधिकारी ,कर्मचारी वर्गांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले…रमेश भै य्या परदेशी ह्यानी सर्व नगरसेवक व नगरसेविकातर्फे
कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमीत सर्व एरंडोल वासियाना व नपा कामगाराना आरोग्य दायी शुभेच्छा दिल्यात …..
ह्या प्रस्ँगी उपस्थीत एरंडोल तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.सुधिर काबरे ह्यांनी कोरोनाच्या लढ्यात एरंडोल शहरातील विविध यंत्रणा करत असलेल्या कार्यात डॉक्टर मंडळी ही सहभागी असल्याचे सांगीतले…व ह्यापुढे ही जशी गरज लागेल तसे सहकार्य प्रशासनास करणार असल्याचे नमुद केले ….
ह्या प्रसंगी उपस्थीत असलेले कार्यालयीन अधिक्षक श्री .संजय धमाळ ह्यांना डॉ.नरेंद्र ठाकूर,ह्यांना सुखकर्ता फाऊंडेशन च्या वतीने ह्यापूर्वी सभागृहात व बाहेर, नपा अधिकारी वर्गासमोर माण्डलेल्या काही सुचना व प्रस्तावांचे स्मरणपत्र सुपूर्द केले ..त्यात प्रामुख्याने
एरंडोल शहरातील जैववैद्यकीय कचरा व त्याच्या विल्हेवाटीत असलेल्या समस्ये कडे लक्ष वेधले आहे …
त्याचप्रमाणे आगामी काळात नपाने स्वमालकीचे अतीप्रगत असे फवारणी (foggers ) मशीन ,व्ह्यकुम क्लिनर मशीन ,व महिलांसाठी फिरते शौचालय (मोबाइल टॉयलेट) घेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी ,एरंडोल नपात आपत्ती निवारण केंद्र व अधिकारी नियुक्त करुन त्यांच्या द्वारे येण्यार्या सुचना ,निर्देश ह्या ऑफिशियल लेटर प्यड च्या द्वारेच सर्व समाज माध्यमांकडे,प्रिंट मिडी याकडे पोहोचविल्या जाव्यात ,
नपा मार्फत करण्यात येणार्या पाणीपुरवठ्यात व नियोजनात काही संभाव्य बदल असल्यास किन्वा दिरंगाईने होणार असल्यास तशी सुचना प्रशासकीय पातळीवर सर्व नगरसेवकाना सुचित करण्यात येऊन सामाजिक माध्यमात कळ विन्यात येण्याची पध्दत चालू करण्यात यावी जेणेकरुन नागरिकामध्ये गैरसमज व असुविधा होणार नाही….
एरंडोल नपा च्या विधायक व स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणार्या विविध उपक्रमात जनतेचा सहभाग *लोकसहभाग *वाढावा म्हणुन काही सामाजीक संस्था व कार्यकर्ते ह्याना नपा मार्फत @@स्वच्छता दुत म्हणून नियुक्ति करण्यात यावी…..अश्या समाजहिताच्या सूचनांचा त्यात समावेश आहे …
वरील सर्व मागण्यांवर प्रशासन कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री .धमाळ ह्यांनी सुचित केले ..
ह्याप्रसंगी मुख्य लेखापाल आर .के.पाटील ह्यांच्या बरोबरच कार्यालयीन कर्मचारी ज़ाम्बरे,संदीप शिंपी ,व किरण चौधरी,हरिचंद्र अटवाल,संतोष खोकरे ह्यां कामगारांची प्रातिनिधिक उपस्थीती होती ….
कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला सुखकर्ता फाऊंडेशन कडुन मिळालेल्या ह्या सरंक्षक साहित्याबद्ल कामगार वर्गाने समाधान व्यक्त करुन आभार मानले ….