जामनेर /विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळ राज्य कार्यकारिणी आणि सदस्य यांच्या निवडीची घोषणा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.ह.भ.प .प्रकाश महाराज बोधले यांनी पत्रकार परिषदेत केली .त्यामध्ये अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य अध्यक्ष पदी श्री. ह. भ. प.सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर ) तर उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब बोधले महाराज, कोषाध्यक्ष म्हणून ह. भ.प. भाऊराव महाराज पाटील सर (मुक्ताईनगर )यांची नियुक्ती केली .तर राज्य कार्यकारिणीत सदस्य म्हणून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भरघोस प्रतिनिधित्व मिळाले .यात राज्य सदस्य म्हणून ऋषिकेष महाराज (रावेर),भागवत महाराज कदम (मुक्ताईनगर), जीवन महाराज राऊळ (बोदवड), गजानन महाराज मांडवेकर (जामनेर), चंद्रकांत महाराज साक्रीकर (भुसावळ), भागवत महाराज देशमुख( जळगाव), पराग महाराज (यावल,),विवेक महाराज (चोपडा), वाल्मिक ऊर्फ जीभाऊ महाराज (चाळीसगाव), प्रा. सी एस पाटील सर (धरणगाव )यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकार्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बोधले महाराजांनी स्वागत केले .
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते.
अ.भा.वारकरी मंडळाच्या अधिपत्याखालीपुढील काळात लवकरच वारकरी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून या माध्यमातून वारकरी घडविण्याबरोबरच संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर केला जाईल .पदवी,पदव्युत्तर शिक्षण ,संशोधनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीहभप प्रकाश महाराज बोधले यांनी यावेळी दिली.