लॉकडाउन बैठक / नरेंद्र मोदींची उद्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे बैठक

0

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पाचव्यांदा व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे बैठक घेणार आहेत. यादरम्यान 17 मे रोजी संपणाऱ्या लॉकडाउनविषयी चर्चा होईल. रविवारी काही राज्यांनी प्रवासी मजुरांबाबत चिंता व्यक्त केली. या राज्यांचे म्हणने आहे की, प्रवासी मजुरांच्या वापसीमुळेच कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत आहे.

सोमवारी मोदी 51 दिवसात पाचव्यांदा व्हिडिओ कॉन्फ्रँसिंग करतील. यापूर्वी त्यांनी चारवेळा मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओद्वारे चर्चा केली आहे. त्यांनी 20 मार्च, 2, 11 आणि 27 एप्रिलला व्हिडिओद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला आहे.

अनेक राज्यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनवर उपस्थित केले प्रश्न

कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी रविवारी सर्व राज्यांचे आणि यूटीचे चीफ सेक्रेटरी (मुख्य सचिव) आणि हेल्थ सेक्रेटरी (आरोग्य सचिव)यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फ्रँसिंग केली. सूत्रांनी सांगितल्यानुसार, अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी आखण्यात आलेल्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तीन वेळेस वाढला आहे लॉकडाउन

पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी 25 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा केली होती. पहिल लॉकडाउन 21 दिवसांसाठी होता. त्यानंतर 14 एप्रिलपासून 19 दिवसांसाठी याला वाढवण्यात आले. त्यानंतर 3 मे पासून हा लॉकडाउन आणखी 14 दिवसांसाठी वाढवून 17 मे पर्यंत करण्यात आल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here