महाराष्ट्र कोरोना / राज्यातील संक्रमितांचा आकडा 15 हजार 525 वर; नागपुरात एकाच दिवशी 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

0

मुंबई. महाराष्ट्रात मंगळवारी 841 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यापैकी एकट्या मुंबईतील सर्वाधिक 635 रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 15 हजार 525 वर पोहचला आहे. मुंबईमध्ये 48 तासात 1145 नवीन रुग्ण समोर आले. नवीन रुग्णांसोबत मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 758 झाली आहे. धारावीमध्ये 33 नवीन रुग्ण सापडले, तेथील एकूण संख्या 665 वर पोहचलू असून, राज्यात कोरोनामुळे काल 34 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील एकूण मृतांचा आकडा 617 झाला आहे. तसेच, आतापर्यंत 2,819 रुग्ण ठीक झाले आहेत.

नागपुरात आज एकाच दिवशी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकट्या निरी प्रयोगशाळेतील तपासणीत 16 पॉझिटिव्ह निघाले. काल मृत्यू झालेला 22 वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. आतापर्यंत शहरात तिघांचा मृत्यू झाला.

मुंबईत दारुची दुकाने बंद राहतील

मुंबईत सलग दुसऱ्या दिवसी दारुच्या दुकानात होत असलेली गर्दी पाहता बीएमसी कमिशनर प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांनी अत्यावश्यक नसलेली दुकानेही बंद ठेवण्यास सांगितले आहे. परंतू, किराना आणि मेडिकल स्टोअर्स सुरुच राहतील.

राज्यात एकाच दिवशी 350 बाधितांना रुग्णालयांतून सुटी

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सोमवारी दिवसभरात राज्यातील एकूण ३५० रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाइकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई मंडळात राज्यात सर्वाधिक २२८ रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना सुटी देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे मंगळवारी दिली.

सोमवारपर्यंत राज्यात एकूण २४६५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याने चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.

दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी सुटी देण्यात आलेल्या रुग्णांत मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण-डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३, तर पनवेल मनपा येथील २ अशा मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२, तर सातारा येथील २ अशा पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा १, बुलडाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशाळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणेदोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here