भुताची जत्रा” म्हणून प्रसिद्ध असलेल्या आगडगावात काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा !

0

अहमदनगर : (सुनिल नजन /अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात “भुताची जत्रा”भरते म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या आणि अहमदनगर शहरापासून पुर्वेला सतरा किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र आगडगाव येथील काळभैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सप्ताहाच्या निमित्ताने,अखंड हरिनाम,महिलांची भजने,अनेक नामांकित किर्तनकारांची किर्तने,होम हवन, महायज्ञ,काशिखंड या ग्रंथाचे सामुहीक पारायण, जन्मोत्सवासाठी काळेगाव टोक येथून आणलेल्या पाण्याने रात्री बारा वाजता गंगा जलाभिषेक, सामुदायिक भोजन,असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात पार पडले. ह.भ.प.समाधान महाराज भाजेकर यांचे काल्याचे किर्तन होउन या काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी, काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष- बलभीम कराळे, उपाध्यक्ष- साहेबराव गायकवाड, सचिव-त्रिंबक साळुंखे, खजिनदार-दिलिप गुगळे,सल्लागार- मुरलीधर कराळे,विश्वस्त- सौ.चंद्रकला खाडे,नितीन कराळे,संभाजी कराळे,गोरक्षनाथ जाधव,दिलिप गायकवाड, तुळशिदास बोरुडे,व्यवस्थापक नामदेव कराळे यांनी विषेश परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ,सर्व पक्षाचे राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here