मुंबई-कामाठीपुरा (प्रतिनिधी-राजेंद्र लकेश्री)
महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात कार्यरत असणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राच्या मुंबई शाखेच्या सन २०२२-२३ च्या कार्यकारीणीची निवड महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कामाठीपुरातील श्री दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. प्रास्ताविक भाषण सर्वश्री राजेंद्र लकेश्री यांनी करून पत्रकार समितीच्या कार्याची माहिती सादर केली. यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी मुंबई समितीच्या अध्यक्षपदी श्री राजेन्द्र लकेश्री, कार्याध्यक्ष म्हणून साहित्यिक-पत्रकार-कवि डॉ.खंडू माळवे, उपाध्यक्षपदी श्री.महेश्वर तेटांबे, प्रकाश बाडकर तर सरचिटणीसपदी आनंद मुसळे, चिटणीस साठी राजेश्वर जोगू, धनंजय कोरगावकर, खजिनदार म्हणून संतोष कोलगे, हिशेब तपासनीस पदी अशोक परब तर, कार्यकारीणी सदस्यपदी सर्वश्री – दत्ताराम वंजारे, संतोष बंदरे, विश्वनाथ तळेकर, हेमंत अनुमाला,मनोज संखे, रघुनाथ शेरे,बबन जोशी, श्रीहरी गोसीकोंडा, प्रमोद तरळ,तर मुंबईच्या महिला उत्कर्ष समिती कार्याध्यक्षपदी सौ.सुषमा बेर्डे आणि सल्लागार पदी ॲड. दिपरत्नाकर सावंत, ॲड.मंदार चिखले, लियाकत अल्ली सय्यद, डॉ. उमाकांत रागटे इत्यादींची निवड नियुक्त्त पत्र व ओळखपत्र उपस्थित मान्यवर मा. नगरसेवक श्री. बबन गवस, महाराष्ट्राचं सचिव डॉ. वैभव पाटील, सुरेश काळे, राजेंद्र नरवणकर आणि शाकिर अन्सारी, यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय गोलपटू व अर्जून पुरस्कार विजेते श्री. मोहम्मद युसूफ अन्सारी, ओबीसी राष्ट्रीयनेते डॉ. सय्यद इक्बाल, समाजसेवक जेष्ठ पत्रकार मुशीद अन्सारी, सल्लाउदीन शेख हारून अपरोज, श्रीमती. सहारा खान, इस्मितीयाज, आसिफ अन्सारी, कमाल अन्सारी, समाजसेवक श्री. फिरोजशहा मोहम्मद शहा, महम्मद साजिद अन्सारी, गजानन महाडीक आणि श्री. रोहित गिरोल्ला यांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ व सन्मानपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला.