वाघोली सेवा सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाचा”गड आला, पण सींह गेला

0

(अहमदनगर/सुनिल नजन) नगर जिल्ह्याचे सहकार महर्षी स्व.मारुतराव घुले पाटील यांनी शेवगाव तालुक्यात स्थापन केलेल्या वाघोली विविध कार्य कारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाचे तेरा पैकी बारा उमेदवार हे विजयी झाले परंतु तेरावे इतर मागासवर्गीय गटातील उमेदवार चंद्रकांत रणमले हे मतविभागणी मुळे थोड्या फरकाने पराभूत झाले.”गड आला पण सींह गेला”याचा संपूर्ण सत्ताधारी गटाला जबरदस्त धक्का बसला. सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळ हे माजी आमदार चंद्र शेखर घुले, नरेंद्र घुले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले, सभापती क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे गटाने हात मिळवणी करून तिन उमेदवार उभे केले होते ते सर्व निवडून आले. एकंदरीत घुले-काकडे गटाने बाजी मारून तेरा पैकी बारा उमेदवार निवडून आनले. विरोधी शेतकरी ग्रामविकास मंडळाचे सोपान जगन्नाथ जमधडे हे (४७० )मते मिळवून विजयी झाले.सर्व जमधडे गट एकत्र झाल्यामुळे सत्ताधारी गटाचे चंद्रकांत रणमले यांना(४२८)कमी मते मिळालीआणि त्यांचा पराभव झाला.ज्ञानेश्वर विकास मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- स्त्री राखीव गटातून सौ.हिराबाई पंडीतराव भालसिंग या सर्वाधिक (५८४मते)मिळवून विजयी झाल्या.सौ.मिराबाई भिमराज शिंदे(५५४मते), अनुसुचित जाती गटातून रतन उत्तम आल्हाट (५७५मते),भटक्या जमाती गटातून शेषराव शामराव आव्हाड(५४२मते),कर्जदार गटातून पांडुरंग मुरलीधर दातीर (५४०मते),दिलिप किसन आव्हाड(५३२),रमेश कुंडलीक आव्हाड(५१५मते),गंगाधर दादा भालसिंग(५१३मते),विठ्ठल मारुती आव्हाड(५१०मते),अमोल भगवान आव्हाड(५०३मते),दिलिप गंगाराम तुतारे(४९८मते), गंगाधर आश्रू वांढेकर(४९०मते) मिळवून विजयी झाले.विरोधी शेतकरी मंडळाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे मते मिळाली आव्हाड दिलीप त्रिंबक(४६२), आव्हाड बाबासाहेब(४३९),आव्हाड शांतीलाल(४५१), तांदळे रामनाथ(४२९), दातीर अशोक(४७२), ब्राह्मणे आबासाहेब(४२६),भालसिंग भागवत(४५९) शेळके गोविंद(४४१), आल्हाट दादू(४५९),शिंगटे मिना(५०२),आव्हाड सुरेश नाथा(४८७)मते आणि अपक्ष भाउसाहेब शिंदे(९९) मिळाली आहेत. सत्ताधारी मंडळा समोर जबरदस्त आव्हान निर्माण करून शेतकरी मंडळाने जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली होती.जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे व शिवाजीराव काकडे यांनी घरी बोलावून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ही विजयी उमेदवारांचे शाल,फेटे बांधून जोरदार स्वागत केले आहे. या निवडनुकी साठी स्वतः उमेदवार शेषराव आव्हाड सर,साहेबराव आंधळे,नारायण आव्हाड, भरत वांढेकर, आल्हाट सर,पंडीतराव भालसिंग, दातीर सर,दातीर मामा यांनी विशेष परिश्रम घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.यु.लकवाल यांनी काम पाहिले, सचिव बलभीम मोरे यांनी विषेश सहकार्य केले. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here