जवखेडे दुमाला सोसायटीच्या निवडनुकीत सत्तेचे परिवर्तन, सत्ताधारी अंबिका शेतकरी पँनलला अवघ्या तिन जागा तर विरोधी भैरवनाथ शेतकरी पँनलला दहा जागा

0

(अहमदनगर/सुनिल नजन) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी अंबिका शेतकरी पँनलला अवघ्या तीन जागा आणि विरोधी भैरवनाथ शेतकरी पँनलला दहा जागा मिळून सोसायटीच्या निवडणूकीत सत्तांतर झाले आहे. विरोधी भैरवनाथ शेतकरी पँनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्व साधारण कर्जदार गटातून कचरू कारभारी नेहुल(१४१मते), रमेश कारभारी नरवडे(१३६मते), भास्कर बप्पा नेहुल(१३४मते), भिवाजी पुंजा नेहुल(१३०मते), संदिप प्रल्हाद नेहुल(१३०मते),अनुसूचित जाती मधून भानुदास नाना सोणवणे(१२४मते),ईतर मागास वर्गीय गटा मधून प्रमोद अरविंद काकडे (१४९मते), महिला राखीव गटातून सौ.सविता वसंत नेहुल(१३०मते),सौ.आसराबाई शिवाजी नेहुल(११९मते)(चीठ्ठी टाकून),भटक्या जमाती मधून आदिनाथ आसाराम गीरी हे बिन विरोध निवडून आले आहेत. अंबिका शेतकरी पँनलचे कर्जदार गटातून वसंत धोंडीराम नेहुल(१२१मते), संभाजी गजानन नेहुल(१२४मते), सचिन विश्वास नेहुल(१२८मते)हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.आणि पराभूत झालेले उमेदवार पुढील प्रमाणे भैरवनाथ पँनलचे आसाराम कोंडीराम कर्पे(११८मते),उत्तम आंबादास नेहुल(११५मते), बाबासाहेब मारुती नेहुल(११६मते), अंंबिका पँनलचे पराभूत उमेदवार संपत कसोटे(१०२मते), अशोक नेहुल(९६मते), दिलिप नेहुल(११६मते), शिवाजी पुंजा नेहुल(१११मते), ज्ञानेश्वर नेहुल(११२मते), मारिया सोनवणे(११९मते),भिमाबाई नेहुल(११५मते), हिराबाई नेहुल(११९मते) सुभाष काकडे(९३मते) हे उमेदवार पराभूत झाले आहेत. महिला राखीव गटातून सौ आसराबाई नेहुल आणि हिराबाई नेहुल यांना ११९ सम-समान मते मिळाली, दानियल वैभव गायकवाड या पाच वर्षांच्या मुलाने सौ. आसराबाई शिवाजी नेहुल यांच्या नावाची चिठ्ठी काढून त्यांना विजयी घोषित करण्यात आले. फक्त दोन मते बाद झाली.अंबिका पँनलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजी गजानन नेहुल हे करीत होते तर भैरवनाथ पँनलचे नेतृत्व भाजपाचे नेते विठ्ठल भिमराज नेहुल साहेब हे करीत होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.डी.पारधे,व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून योगेश नरसिंगपूर कर साहेब यांनी काम पाहिले.भैरवनाथ पँनलच्या विजया साठी भागवत नेहुल, भिकाजी नेहुल, भगवान गीरी सर,विक्रम नेहुल सर,शिवाजी नेहुल, चारुदत्त नेहुल, अजित नेहुल, महेश नेहुल, नरवडे सर,वसंत कर्पे,अशोक नेहुल, बबन नेहुल, मन्नू गीरी,भगवान काकडे, वसंत नेहुल यांनी विषेश परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे व्रुदेश्वर साखर कारखान्याचे संचालक जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांनी सन्मान सोहळा साजरा अभिनंदन केले आहे.पो.काँ. साठे मँडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here