हनुमान टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमन पदी सुभाष रभाजी बर्डे तर व्हाइस चेरमन पदी भाउसाहेब मळुपाटील उघडे यांची निवड

0

(अहमदनगर/सुनिल नजन) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात गाजलेल्या श्रीक्षेत्र हनुमान टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमनपदी पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष रभाजी बर्डे यांची तर व्हाइस चेरमन पदी कोपरे गावचे युवा नेते भाउसाहेब मळूपाट़ील ऊघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी योगेश नरसिंगपूर साहेब यांनी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्यामुळे निवडीची घोषणा केली.यावेळी टाकळी आणि कोपरे गावचे अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. अनेकांनी या निवडीचा सोहळा सहायक निबंधक कार्यालया समोरच साजरा केला. दोन्ही गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी व्रुदेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे,पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. या सोसायटी वर पुर्वी पासूनच शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांचे वर्चस्व आहे. आमदार राजळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मानही केला आहे. यावेळी कोपरे ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव आव्हाड,माजी चेरमन अशोक काजळे,संजय बर्डे,नितिन आव्हाड,निलेश काजळे,संतोष बावणे,अर्जुन बावणे,बाळासाहेब बर्डे,दिपक धनवटे,संजय डमाळ, पोपट वाघमोडे,यांच्या सह संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करू अशी ग्वाही नवनिर्वाचित चेरमन सुभाष बर्डे यांनी दिली.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here