बेस्टच्या गायन व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न.

0

मुंबई-वडाळा-आणिक आगार (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
नुकतेच “बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या” संगीत व साहित्य विभागाच्या वतीने कै. रमेश रणदिवे कलादालन, आणिक आगार येथे सुगम संगीत गायन व अभंग गायन तसेच नृत्य स्पर्धांचे आयोजन केले होते. गायन स्पर्धेत बेस्टच्या सुमारे ८० तर नृत्य स्पर्धेत सुमारे १० कर्मचारी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. सुप्रसिद्ध संगीतकार श्री.प्रशांत ठाकरे आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका डॉ.शिल्पा मालंडकर यांनी गायन स्पर्धेचे तर सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्री.अनिकेत जाधव यांनी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले, सदर कार्यक्रमासाठी बेस्ट समिती सदस्य माननीय श्री.सुनील गणाचार्य साहेब, मुख्य अभियंता व सभापती कला डॉ.राजेंद्र पाटसुते, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री.विजय सोनावणे, सभापती क्रीडा श्री.धनंजय पवार, माजी उपसरचिटणीस सुबोध भाई महाले, माजी सरचिटणीस व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीम.सुमित्रा सामंत तसेच भूषण तारी, विनोद आडे, विजय खोले, सुधीर नेमाडे, सलाउद्दीन खाटीक, विजय कोळवणकर, माधव साने, विनोद मगर, अरुण खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुगम संगीत गायन स्पर्धेत प्रामुख्याने (प्रथम क्रमांक-सुनील सावंत), (द्वितीय क्रमांक-इंद्रजित पारकर), (तृतीय क्रमांक-योगेश पाटील) तर उत्तेजनार्थ: सुनील गाडे, रमेश देखणे, निझाम अली सय्यद, विजय आयरे, प्रदीप कांबळी आणि सुशांत पुरंदरे यांना तर अभंग गायन स्पर्धेत प्रामुख्याने (प्रथम क्रमांक-सुनील सावंत), (द्वितीय क्रमांक-योगेश पाटील) आणि (तृतीय क्रमांक-माधुरी करंडे) तर उत्तेजनार्थ – नेहा येंधे, रणजीत माळी, प्रमोद कसालकर, महेश पाटील आणि प्रकाश देखणे यांना आणि नृत्य स्पर्धेत (प्रथम क्रमांक-अक्षय पद्माने), (द्वितीय क्रमांक-ममता शेडगे) आणि (तृतीय क्रमांक-राहुल चव्हाण) उत्तेजनार्थ – अनिकेत खैरे, तुषार वाघमारे, संध्या पुरव यांना बहुमान मिळाला.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानद सचिव शेखर कवळे यांच्यासह विजय सूर्यवंशी, संध्या पुरव, सुनील खोबरेकर, अविरत साळवी, संतोष शेट्टी, यतीन पिंपळे, संतोष दळवी, भूषण मेहेर, संदीप खराडे, अभय चव्हाण, दीपक कारेमोरे, सुनील जडीयार रुणाल सावंत, दिलीप लिगम, अनिल चौगुले, रियाझ पठाण, संदीप श्रीवर्धन या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.( धन्यवाद
महेश्वर तेटांबे (सिनेनाट्य दिग्दर्शक,पत्रकार)
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here