वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाचे जोरदार शक्ती प्रदर्शन?

0

(अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सहकारात अग्रगंण्य म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जाहीर सभा गाजवली.ज्ञानेश्वर विकास मंडळाचे नेतृत्व अशोक दातीर सर,सुधाकर आल्हाट सर,भरतराव वांढेकर,पंडीतराव भालसिंग,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे ,निव्रुत्ती दातीर,नारायण आव्हाड, पांडुरंग नागरे,राजेंद्र शिरसाठ, दिनकर फुंदे, हे करीत आहेत.ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळातर्फे”छत्री”या निवडणूक चिन्हावर कर्जदार मतदार संघातून अमोल भगवान आव्हाड, दिलिप किसन आव्हाड,रमेश कुंडलिक आव्हाड, विठ्ठल मारुती आव्हाड, दिलिप गंगाराम तुतारे, पांडुरंग मुरलीधर दातीर, गंगाधर दादा भालसिंग, गंगाधर आश्रू वांढेकर, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रतन उत्तम आल्हाट, महिला राखीव मतदार संघातून सौ. हिराबाई पंडीतराव भालसिंग,सौ. मीराबाई भिमराज शिंदे, इतर मागासवर्गीय मतदार संघातून चंद्रकांत निव्रुत्ती रणमले,भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून शेषराव शामराव आव्हाड हे एकूण तेरा उमेदवार निवडनूक लढवित आहेत.ही सोसायटी वडुले-वाघोली-चव्हाणवाडी या तिन्ही गावातील ११७४ सभासदासाठी कार्यरत आहे. प्रारंभी ज्ञानेश्वर मंडळाच्या सर्व उमेदवारांनी वडुले खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी,चैतन्य कानिफनाथ आणि वाघोली येथील वाघेश्वरी,जोडीचे मारुती, सद्गुरु यादवबाबा वाघोलीकर मंदिरात जाऊन महापुजा केली.त्यानंतर जाहीर सभा झाली. यावेळी अनेक नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.या प्रसंगी वाघोली येथील पंडीतराव भालसिंग, विश्वास वांढेकर, प्रकाश वांढेकर,शंकरराव भालसिंग, दिलिप भालसिंग, किशोर गाडगे,अरुण मतकर,महेश दातीर,वडुलेखुर्द येथील दोन म्हातारदेव आव्हाड,किसन आव्हाड, गोरक्ष आव्हाड, भिमराज आव्हाड, मल्हारी आव्हाड, आदिनाथ आव्हाड, मेजर सुरेश आव्हाड,गहिनीनाथ रणमले,मारुती पांढरे,सुखदेव तुतारे, मुकुंद आंधळे,कानिफनाथ आव्हाड, गणेश आव्हाड,नवनाथ आव्हाड,यांच्या सह तिन्ही गावातील अनेक मतदार उपस्थित होते.आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.ही निवडणूक १५ मार्च रोजी होत आहे. अनेकांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.काही लोकांनी निवडून येणार म्हणून पैजाही लावल्या आहेत.संपूर्ण शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील जनतेचे या निवडणुकी कडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here