ज्ञानोबा मालुसरे यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान

0

मुंबई : श्री संत तापोनिधी गणेशनाथ महाराज वारकरी सांप्रदाय आळंदी-पंढरपूरचे अध्यक्ष, पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ किर्तनकार-प्रवचनकार ह.भ.प. ज्ञानोबा विठोबाआण्णा मालुसरे यांना आज रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने ‘रायगड भूषण पुरस्कार’ अलिबाग येथे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या उद्योग-पर्यटनमंत्री ना आदितीताई सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, शेकापचे पंडितशेठ पाटील, मुख्य कार्यकारी अध्यक्ष डॉ किरण पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, जि प सदस्या सुमनताई कुंभार, शेकापचे वैभव चांदे उपस्थित होते. नरवीर तानाजी मालुसरे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेल्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव-विठोबाराव मालुसरे वंशज असलेल्या ज्ञानोबा मालुसरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाड-पोलादपूर तालुका व मुंबई-ठाणे शहरातून त्यांचे सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here