प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, अहमदनगर मध्ये आरक्षण हटवन्यावर जोर, तर बीडमध्ये संविधान बदलन्याच्या चर्चेवर भर

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) भारतदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यावर जोरदार टीका करत नगर – बीडमध्ये सभा गाजवली. अहमदनगर येथे बोलताना प्रथम साईबाबा, अहिल्यादेवी, माळीवाडा गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांना वंदन करून भाषणाला सुरुवात केली.विरोधी इंडिया आघाडीचा उल्लेख “इंडी आघाडी” करत त्यांच्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला.मोदी विरोधी नेत्यावर आरोप करताना म्हणाले की काँग्रेस आणि त्यांचे साथीदार फार खतरनाक खेळ खेळतात.चारा घोटाळ्यात कोर्टाने शिक्षा देऊन दोषी ठरवलेले लालू प्रसाद यादव आज सकाळी म्हणाले की इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आले तर मुस्लिम समाजाला पुर्णपणे आरक्षण देण्यात येईल. एसटी, एस्सी,ओबीसी चे आरक्षण आता कोणाकडे आहे ते तुम्ही पहा.असे सांगून मोदींनी मागासवर्गीय मतदारांची मते खेचन्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत प्रथम वैजनाथ, भगवान बाबा, नारायण महाराज,योगेश्वरी देवी यांना वंदन करून विरोधकावर जोरदार टीका करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर ते 370 कलम पुन्हा बसवनार,सीए,तिन तलाक,किसान सन्मान निधी, मोफत रेशन, पाच लाखापर्यंत देण्यात येणारा मोफत ईलाज,हे सर्व बंद करतील.तसेच राममंदिराचा निकाल बदलवनार,26/11च्या हल्ल्यातल्या लोकांना क्लिक चिट देणार असल्याचे मोदींनी सांगितले.तसेच चारा घोटाळ्याचा बीडमध्ये उल्लेख करून हे लालू प्रसाद यादव आणि त्यांची टीम हे संविधान बदलून मुस्लिमांना पुर्ण आरक्षण देणार आहे. ही मागासवर्गीय लोकांना धोक्याची घंटा आहे.त्यांनी पण मोदी जिवंत आहे तोपर्यंत कोणाचेही आरक्षण हटवनार नाही असे निक्षून सांगितले.
खरी शिवसेना,आणि राष्ट्रवादी भाजप सोबत आहे. नकली राष्ट्रवादी सेना काँग्रेस सोबत आहे. असे मोदींनी सांगितले. बीडमध्ये प्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोदींना दांडपट्टा, गुलाबी वारकरी पगडी व काठी आणि घोंगडं,योगेश्वरी देवीचा फोटो देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना.धनंजय मुंडे,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रितम मुंडे, सुरेश धस,नमिता मुंदडा, बाळासाहेब आजबे,भैय्या पंडीत, भिमराव धोंडे, बाळासाहेब दोडतले,उषा मुंडे, आणि उमेदवार पंकजा मुंडे हे उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांचे अहमदनगर येथे तिन वाजून पंन्नास मिनिटानी तर बीड येथे पाच वाजून आठ्ठेचाळीस मिनिटानी आगमन झाले. सहा वाजून पाच मिनिटानी भाषणाला सुरुवात झाली आणि सहा वाजून सदोतीस मिनिटानी संपवले. अहमदनगर येथे चार वाजून दोन मिनिटानी मोदींनी भाषण सुरू केले.आणि चार वाजून सत्तावीस मिनिटानी संपवले. अहमदनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री राधाकृष्ण विखे,मंत्री दादा भुसे, आमदार मोनिकाताई राजळे, आ.राम शिंदे, संग्राम जगताप, शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे,मधुकर पिचड, आशुतोष काळे, चंद्रशेखर कदम,हे आवर्जून उपस्थित होते. मोदींनी अहमदनगर येथील भाषणात स्व.बाळासाहेब विखे यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. भाजप सरकारने केलेल्या विकासात गरीबी कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान यांचा समावेश होता.या विषयावर काँग्रेस का बोलत नाहीअसा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षांत फक्त गरीबी हटावचे वायदे केले आणि गरीबांचा विश्वास घात केल्याचा आरोपही मोदींनी केला. तेरा तारखेला शिर्डीत सदाशिव लोखंडेच्या धनुष्यबाणाला आणि नगर मध्ये सुजय विखेंच्या कमळाला मतदान करण्याचे आवाहन मोदींनी केले. मुख्यमंत्री शिंदे बीडमध्ये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर येथे उपस्थित होते. गेल्या पाच वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांच्या आमदारकीच्या निवडणूकीत देवेंद्रजींनी केलेल्या बीड मधील करामतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती म्हणून तर ते बीडमध्ये आले नाहीत ना अशी कुजबुज बीडमध्ये दबक्या आवाजात सुरु होती. मोदींच्या महाराष्ट्रातील सभेने महायुतीच्या उमेदवारांना नवचैतन्य मिळाले आहे.मतदार नेमके कोणाच्या बाजूने कौल देतात हे चार जूनलाच समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here