भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

0

नांदगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद गट प्रमाणे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन केले आहे याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी साकोरा या जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास गटातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते, बूथ प्रमुख शक्तीयुत प्रमुख सरपंच सदस्य चेअरमन डायरेक्टर तसेच शाखाप्रमुख, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय पक्षातील पदाधिकारी यामुळे उपस्थित होते,

आमदार सुहास आण्णा कांदे मनोगत :
उमेदवार डॉ. भारती ताईंकडे 9 विधानसभा मतदार संघाचा कारभार आणि त्यातच केंद्राचे मंत्रिपद आल्याने त्यांचे कार्यक्षेत्र अवघे राज्य आहे. त्यामुळे वेळ मिळाला नसेल प्रत्येकाला भेटण्यासाठी. पण आम्ही तुम्हाला ताईंची कमतरता भासू दिली नाही. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सतत सोबत होतो आणि आहे, देशहितासाठी देशाच्या उन्नतीसाठी म्हणून भारती ताईंना सर्वाधिक मते आपल्या मतदार संघातून मिळवून द्यायचे आहे व मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असा निर्धार केला.उगाच नकारात्मक बोलू नका, सुहास आण्णा ला मतदान करायचे आहे असे समजून काम करा असे ही मार्गदर्शन यावेळी केले.महायुतीच्या डॉ. भारती ताई पवार यांच्या विजयाचे श्रेय शिवसेना घेईल म्हणून मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी (अजित पवार गट ) राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट ) तुतारी चे काम करत आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे. विश्वासघात करायचा असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या.. मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून उदगार काढले.या वेळी बापूसाहेब कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले -: निवडणूक देशाची आहे तिला स्थानिक प्रश्नांची जोड देऊन संबंध जोडणे योग्य नाही. कारण कार्यक्षेत्र मोठे असल्याने कामासाठी मर्यादा येतात. तुमच्या कामासाठी सुहास अण्णा इनामदारीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी ताईंना मतदान करा. ताई खासदार झाल्या तरच मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतील. तुतारीचे बटन दाबून तुमची तुतारी वाजवून घेऊ नका.सौ.अंजुम ताई कांदे -: एक प्रचलित पद्धत आहे कि, प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये, ते फायद्याचे ठरत नाही. अण्णांच्या शब्दावर विश्वास ठेवून भारती ताईंना भरघोस मतांनी निवडून देऊ.
प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी केले.सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांनी केले.तर विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मतदारसंघातना भूतून भविष्यातील असा विकास केल्याचे सांगून आण्णा सांगतील तेच धोरण असा निश्चय केला. यात विष्णू निकम, दिलीप इनामदार, राजेंद्र पवार, राजाभाऊ जगताप, संजय सानप,अण्णासाहेब पगार, अप्पासाहेब पगार, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मळगाव व हिंगणवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा आमदार सुहास आण्णांनी भगवी शाल देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब कवडे,
व्यासपीठावर -: आमदार सुहास अण्णा कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलासराव आहेर, सौ. अंजुम ताई कांदे, विष्णु निकम सर, भाजप तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, राजेंद्र पवार,अंकुश कातकडे, संजय आहेर, रमेश पगार, महिला आघाडी च्या सौ. उज्वला ताई खाडे, सौ.श्रद्धा कुलकर्णी, ॲड.विद्या कसबे, अण्णासाहेब पगार, अनंत इनामदार, सभापती अर्जुन निकम, उपसभापती दीपक मोरे,
रमेश बोरसे, तेज कवडे, संजय सानप, भिका दराडे, अरुण भोसले, दिगंबर भागवत, सतीश बोरसे, सागर फाटे, राजाभाऊ जगताप, पोपट सानप, अँड. राजेंद्र दराडे, मधुकर सुरसे, मधुकर गिते, अण्णासाहेब पगार, भगवान शेठ, उमेशकुमार सरोदे उपस्थित होते.
याप्रसंगी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायडोंगरी गट 8/5/2024
जातेगाव गट 9/5/2024
भालूर गट 11/5/2024 रोजी मेळावा आयोजित केला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here