अहमदनगर (सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) देशाचे नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्याला सुजय विखेंना विजयी करायचे आहे. मी कितीही संकटात असले तरी आणि माझ्या जिल्ह्यात कितीही विषारी जातीयवादाचे राजकारण होत असले तरी मी सुजय विखे या मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी येथे आले आहे. हे माझ्या बीड जिल्ह्यातील लोकांनी आवर्जून पहावे. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे आम्ही कधीच जात पात पहात नाही स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तातील गुण आमच्या त आहेत. मी बीड जिल्ह्यात लोकसभेला उभी आहे. माझ्या विजयासाठी मोहटादेवी ची खणा नारळाने ओटी भरा,भगवान बाबाचे आशिर्वाद घ्या आणि सुजय विखेंना खासदार करण्यासाठी कमळाचे बटण दाबा.तसेच माझ्या बीड मतदार संघातही आपल्या पाहुण्यांना सांगून मला मदत करा.आणि माझ्या बरोबर संसदेत काम करण्यासाठी सुजय विखेंना विजयी करून पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत केले. भर पावसात लोकांचा प्रचंड उत्साह आणि सभेतील गर्दी पाहून सुजय विखे भारावून गेले. त्यांनी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही असे पंकजा ताईंना आवर्जून सांगितले. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांनी या सभेत मतदारांचे चांगले स्फुल्लिंग चेतविले. म्रुत्युंजय गर्जे,बापूसाहेब पाटेकर, बाबा राजगुरू, संजय बडे,काशिनाथ लवांडे,देविदास खेडकर, अशोक चोरमले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनी ताई विखे, आमदार मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डिले यांची भाषणे झाली. पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शेवगावचे जिल्हा पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दुपारी एक वाजता सुरु होणारी सभा पावसामुळे प्रत्यक्षात पाच वाजता सुरू झाली.तरीही सभामंडपात अलोट गर्दी दाटली होती हे पाहुन विखे परीवारात समाधानाचे वातावरण पसरले होते. मुंडे समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील मित्र पक्षासह सर्व भाजपाचे जुने नवे कार्यकर्ते चाटून पुसुन हजर होते. शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार गटाचे काही कार्य कर्ते आत बाहेर करत असल्याची कुजबुज सभा मंडपात हलक्या आवाजात सुरू होती. गेल्या पाच वर्षापुर्वी निवडणूक प्रचारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची भर पावसातील सभा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजली होती अगदी त्याच तोडीतील पाथर्डीतील पंकजा मुंडेची सभा भाव खाउन गेली.