विखेंच्या झंजावाती दौऱ्यात पाथर्डी तालुक्यातील अनेक मोहरे भाजपच्या गळाला,रँलीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद

0

अहमदनगर (सुनिल नजन चिफ ब्युरो/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर तथा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजयदादा विखे यांनी पाथर्डी तालुक्यातील प्रमुख गावात रँली काढून रुसले फुगलेले अनेक नवीन चेहरे गळाला लावले आहेत.आणि प्रचाराची आपली बाजू भक्कम केली आहे. केशव शिंगवे,मीरी,शिराळ, करंजी,देवराई, घाटशिरस,शिरापूर,मढी, माळीबाभुळगाव, कारेगाव,टाकळी मानूर,धायतडकवाडी या गावांना भेटी देत प्रचंड मोठ्या प्रमाणात रँलीचे आयोजन करत प्रचारसभा घेऊन तालुक्यातील प्रचाराची तिसरी फेरी पुर्ण केली आहे. सायंकाळी पाथर्डी शहरात पदयात्रा काढून सारे शहर पिंजून काढले. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहून पाथर्डी तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास विखेंनी व्यक्त केला. केशव शिंगवे येथून सुरु झालेल्या रँलीत राजूमामा तागड,आदिनाथ सोलाट,माजी सरपंच संतोष शिंदे, उपसरपंच संजय शिंदे, अंजाबापू गोल्हार,संतोष मिरपगार,एकनाथ आटकर,वैभव खलाटे,प्रताप घोरपडे,मयुर तागड,वैभव आंधळे, चारूदत्त वाघ,संदीप देशमुख, भाउसाहेब उघडे यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मीरी बीटचे पोलीस हेड काँन्स्टेबल विजय भिंगारदिवे, पोलिस काँन्स्टेबल पोपट आव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here