4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था रहिवाशांतर्फे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

0

मुंबई : (मुंबई,दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)दादर पूर्व नायगाव येथे असलेल्या 4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था यांच्यातर्फे एक मे रोजी महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि त्यानिमित्ताने बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल कामगार वसाहतीतील स्थानिक बालकराकारांसाठी तसेच तरुणांसाठी संगीत खुर्ची आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकं देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता मुक्ताई मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमी यांच्या रंगारंग कार्यक्रमाने झाली. मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमीने अतिशय सुंदर रित्या नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकले. तसेच 4ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल कामगार वसाहतीतील स्थानिक बालकलाकारांनी सुद्धा अतिशय उत्तमपणे नृत्य सादर केले. व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य स्पर्धेसाठी परबताई आणि अनिताताई यांनी विशेष मेहनत घेतली त्याचबरोबर मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमी- चुनाभट्टीचे सर्वेसर्वा नृत्य दिग्दर्शक व नाट्यकलाकार श्री विनोद मोहिते व त्यांच्या संपूर्ण टीमचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अध्यक्ष संतोष लोखंडे, सचिव गणेश सावंत, व खजिनदार सत्यविजय परब यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी खूप मेहनत घेतली. 4ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल कामगार गृहनिर्माण संस्था हे नुकतीच स्थानांतर झाली असुन त्यांचा हा पहिलाच सोहळा होता आणि तो म्हणजे महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहाने आणि शांततेत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here