लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

मनमाड : ( हर्षद गद्रे, मनमाड प्रतिनिधी)  लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लायन सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या व्यासपीठावरून प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अन्नपूर्णा अडसुळे, सुषमा तिवारी, आम्रपाली निकम, आदींचा सन्मान करण्यात आला. संगीता कदम यांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत एकांकीके द्वारे सावित्रीबाईंचे विचार मांडले.आय यू डि पी विभागातील लायन्स गार्डन येथे झालेल्या या समारंभात आम्रपाली निकम यांचा वकील झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांवर प्रकाशझोत टाकून त्यांच्या  विचारांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले  डॉ. झाल्टे यांनीदेखील सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा मागोवा घेतला. सुषमा तिवारी यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य विशद करणारी कविता सादर केली. संगीता कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत एकांकीके द्वारे सावित्रीबाईंच्या विचारांचा मागोवा घेतला. अर्चना राठी यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा मतकर यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, सचिव अविनाश पारखे, खजिनदार सोमनाथ चिंचोरे, जेष्ठ सदस्य डॉ. प्रताप गुजराती, एड. किशोर सोनवणे,पुष्पा मतकर, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अन्नपूर्णा अडसुळे, आम्रपाली निकम, सुषमा तिवारी, संगीता कदम, सुमन रणदिवे, आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी केले. अविनाश पारखे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. निलेश राठी चंद्रकांत मेंगाणे, सुमन रणदिवे, रेखा येणारे, आदींनी प्रयत्न केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने लायन्स सदस्य, नागरिक खासकरून महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here