पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ओरिजनल पत्रकारांचा सन्मान तर (तोतया)बोगस पत्रकारांना जेलची हवा खाण्यासाठी गजाआड

0

(स्पेशल क्राईम रिपोर्टर सुनिल नजन अहमदनगर जिल्हा) ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तसा तो पाथर्डी पोलिस ठाण्यातही साजरा करण्यात आला. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, उप निरिक्षक रामेश्वर कायंदे,गुप्त वार्ता शाखेचे पोलीस काँन्स्टेबल भगवान सानप यांनी पाथर्डी तील ओरिजनल पत्रकारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन पेन डायऱ्या देऊन गौरविण्यात आले.यामध्ये प्रेसक्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, अविनाश मंत्री,सुनिल नजन, हरिहर गर्जे, जनार्दन बोडखे,उमेश कुलकर्णी, राजेंद्र भंडारी, सुनिल शेवाळे,बाबासाहेब गर्जे, अजय गांधी, संदिप शेवाळे, दशरथ नरोटे,नितिन गटाणी यांचा समावेश होता. तर इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी व्रुत्तपत्राचा पत्रकार म्हणून नाव सांगणाऱ्या तोतया पत्रकाराला पोलिसांनी अगोदरच गजाआड केले होते.पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे गावात उपसरपंच म्हणून घ्यायचे आणि बाहेर पत्रकार म्हणून मिरवायचे हा उपद्व्याप आकाश दौंडे हा ईसम करीत होता.पाथर्डी पोलिस ठाण्यात येउन पत्रकार असल्याचे सांगून पोलिसांशी सोमठाणे गावातील दारु बंद का होत नाही. मी अनेक वेळा पत्र देऊन तुमचे पोलिस काहीच कारवाई न करता दोन नंबर वाल्यांकडून हप्ते खातात असा आरोप करत हातातील कागदपत्रे पोलिसांच्या अंगावर भिरकावून अर्वाच्च भाषा वापरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता म्हणून पाथर्डी पोलिसांनी आकाश दौंडे याला अटक केली आहे.त्यावेळी पोलीस ठाण्यात अनेक पोलिस उपस्थित होते.आकाश दौंडे हा मी “द इंडियन एक्सप्रेस “या दैनिकाचा पत्रकार आहे असे खोटे सांगून पोलिसांशी अरेरावीची अश्शिल भाषा वापरून पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून झटापट केली तेंव्हा उपस्थित पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून या ईसमाच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आणि त्याला गजाआड केले आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात अनेक गावात तोतया, बोगसगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून प्रेस अक्षरे असलेल्या सर्व वाहनांच्या मालकाची तपासणी करुन बोगसगिरी करणाऱ्या तोतया पत्रकारांना गजाआड करावे अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या कडे केली आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक पत्रकारांचे आयकार्ड तपासून त्याची नोंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तालुक्यातील बीट हवालदाराकडे करण्यात येणार आहे.सरकारी अधिकारी वर्गातील लोकांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योग पत्रकारीतेच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू झाला आहे.त्याला पायबंद घालण्यासाठी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले आहे.पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाजपचे नेते गोकुळ दौंड यांनीही भाजप कार्यालयात पाथर्डीतील सर्व पत्रकारांना सन्मानित केले. तिसगाव येथे ही नागेबाबा आणि रेणुकामाता पतसंस्थेच्या वतीने शाखाधिकारी सोमनाथ खंडागळे व कँशिअर देवा झरेकर यांनी पत्रकारांना सन्मानित केले. बोगस पत्रकारांची धरपकड सुरु झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. डीजीटल पत्रकारीतेच्या युगात पत्रकारीतेच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचे दिवस आता संपले आहेत.हे तोतयेगीरी करणाऱ्या महाभागांनी लक्षात घेऊन आपली पावले योग्य दिशेने टाकावीत असे आवाहन पाथर्डी प्रेसक्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर यांनी केले आहे.( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here