मनमाड पत्रकार संघाचे वतीने मनमाड सार्वजनिक वाचनालयास दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली

0

मनमाड : ०६जानेवारी पत्रकार दिन. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस. 1832 साली याच दिवशी कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो. याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड व सतिशसिंह परदेशी यांचे हस्ते मनमाड सार्वजनिक वाचनालयास स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली, मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या प्रतिमेचा वाचनालयाच्या वतीने स्वीकार केला मनमाड शहरातील सांस्कृतिक ,सामाजिक शैक्षणिक व वाचन चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 1955 पासून आज पर्यंत म्हणजे 66 वर्ष मोफत वर्तमानपत्र वाचनालय सुरू आहे ही वृत्तपत्र क्षेत्रा साठी गौरवास्पद बाब आहे ,असे विचार आपले मनोगत मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद बळवंत आव्हाड यांनी व्यक्त केले तर सोशल मीडिया च्या काळात ही वाचन संस्कृती टिकवण्यासाठी लोकशाहीच्या चौथा स्तभ असणाऱ्या सर्व पत्रकार क्षेत्रा चे मनमाड सार्वजनिक वाचनालयास अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे असे सांगत वाचनालयाच्या वतीने सचिव कल्पेश बेदमुथा यांनी उपस्थितांचे ऋण प्रगट केले ,या कार्यक्रमाला मनमाड शहर पत्रकार संघाचे हर्षद गद्रे, सागर भावसार अविनाश पारखे,अमोल बनसोडे,आनंद निकम,जगदीश अडसुळे,अनिस शेख,राजेंद्र तळेकर,सतीश परदेशी बाळासाहेब आहिरे,नरहरी उंबरे,विनोद वर्मा,क्राती बळवंत आव्हाड, विलास आहिरे ,अशोक बिद्री,निलेश व्यवहारे आदी मान्यवरांसह मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ,संध्या गुजराथी ,हेमंत मटकर सौ नंदिनी फुलभाटी उपस्थित होते, मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी संयोजन केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here