मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

0

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे 06 जानेवारी पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या शुभहस्ते शहरातील सर्व नामवंत पत्रकार बंधूंचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.ए.व्ही.पाटील यांनी पत्रकार दिनाचे महत्व विशद केले व सर्व पत्रकार बंधूना महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व महाविद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. आजाद आव्हाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालय प्रति कृतज्ञता व्यक्त केली,या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी. आंबेकर वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सतिश तांबे , कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल यफंड,कुलसचिव समाधान केदारे,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मनमाड शहरातील 30 पत्रकार बंधू उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here