वासोळच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सत्र

0

नाशिक 🙁  प्रशांत गिरासे देवळा ) वासोळ ता.देवळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थीनिंसाठी उद्धबोधन शिबिरही घेण्यात आले.मेशी येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री पगार यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले लसीकरण सत्र यशस्वीतेसाठी वासोळ आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.महेश सूर्यवंशी,आरोग्य सेविका वंदना बच्छाव आशासेविका अलका केदारे आदींनी परिश्रम घेतले.विद्यालयात लसीकरण सत्र आयोजित झाले म्हणून मुख्याध्यापक एस.टी.महिरे यांनी आरोग्य कर्मचार्यांना शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त केले.यावेळी शिक्षक एस.यु.शिर्के,ए.एल.वाघ,व्ही.बी.सावंत,जे.एन.सावकार,एस.डी.ठाकरे,शिक्षिका एस.एन.गुजर आदींसह कर्मचारी बाळू महिरे,अनिल बोरसे आदि.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here