प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी यांच्या वतीने पाथर्डीत पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

0

(प्रतिनिधी अहमदनगर) संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दीनाचे औचित्य साधून पाथर्डी येथील संस्कार भवनात पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दै. दीव्यमराठीचे नगरजिल्हा संपादक अनिरुद्ध देवचक्के,जेष्ठ पत्रकार शामसुंदर शर्मा, बजरंग बिहाणी हे होते तर अध्यक्ष स्थानी प्रतापराव ढाकणे हे होते. प्रथम दिवंगत समाज सेविका आणि “अनाथांची माय”स्व. शिंधुताई सपकाळ यांना उपस्थित पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांना शाल, पेन,डायऱ्या देऊन गौरविण्यात आले.यावेळी शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत, पाथर्डी प्रेसक्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, अविनाश मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी आपले विचार व्यक्त केले.संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी आजच्या पत्रकारितेत बातम्यांची कशी फेकाफेकी सुरू आहे त्याचे सविस्तर वर्णन केले.तसेच नवीन पत्रकारांनी या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक पैलूंवर प्रकाश टाकून योग्य गोष्टी सांगितल्या.आजची पत्रकारिता काही पत्रकार लोकांनी कशी बदनाम केली आहे त्याचेही सविस्तर वर्णन सांगितले.या कार्यक्रमा प्रसंगी बंडू बोरुडे, वैभव दहिफळे,चांद मनियार,महारुद्र किर्तने, पांडुरंग शिरसाट, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन शिवाजी मरकड यांनी तर आभार डॉ राजेंद्र खेडकर यांनी मानले.यावेळी रवी उगलमुगले, रावसाहेब निकाळजे,रामनाथ रुईकर,रणजित घुगे,दिपक खोसे,शंकर गुठे,बाळासाहेब खेडकर, शिवदास मरकड, तुळशीदास मुखेकर,रमेश चौधरी, बाबासाहेब गर्जे, अमोल कांकरिया, राजू शिंदे,क्रुष्णा अंदुरे,हरिहर गर्जे,जनार्दन बोडखे,निजाम पटेल, जयप्रकाश बागडे,सचिन नंनवरे,रमेश जोशी, शाम पुरोहित, सचिन दिनकर, नितीन गटाणी,याकुब शेख,अर्जुन देशमुख,सोमनाथ बडे,जगताप यांच्या सह शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील नामवंत,निर्भिड पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here