ग्रामपंचायत मेशी येथे दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वाटप

0

नाशिक : प्रशांत गिरासे वासोळ
ग्रामपंचायत मेशी येथे दिव्यांग बांधवांना ग्रामनिधीचा पाच टक्के हिस्साचे वाटप करण्यात आले. उपसरपंच भिका बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदर पैसे हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले एकूण 46 लाभार्थ्यांना या निधीचा लाभ देण्यात आला. सदर प्रसंगी मेशी च्या सरपंच सौ सुनंदा अहिरे, उपसरपंच भिका बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती केदा अण्णा शिरसाट, ग्रामसेवक जगन्नाथ शिंदे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाहू शिरसाट, शरद सूर्यवंशी, आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच श्री नरेंद्र खैरनार उत्तर जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना , देवळा तालुका अध्यक्ष बाळू बैरागी , रंजना शिरसाट, माधव शिरसाठ, किरण सोनवणे हे दिव्यांग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here