विठ्ठल गडाचे महंत रामकृष्ण शास्त्री यांच्या हस्ते पाटील कलेक्शनचा शुभारंभ संपन्

0

(अहमदनगर प्रतिनिधी सुनिल नजन) बीड जिल्ह्यातील पांगरा येथील विठ्ठल गडाचे महंत रामक्रुष्ण शास्त्री यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे . “पाटील कलेक्शन” या होलसेल कापड उद्योग कंपनीचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच गोरक्षनाथ अण्णा सातपुते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे चेरमन अश्राजी पाटील सातपुते हे होते. प्रथम देवढे परीवाराच्या वतीने सौ.सानिका बाळासाहेब देवढे, सौ. कुसुमताई देवढे, श्रीमती गीता पवार, सौ.रंजना दळे यांनी महाराजांचे पंचारतीने ओवाळून औक्षण केले. नंतर रामकृष्ण शास्त्री महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.या कंपनीचे संचालक वैभव देवढे आणि बाळासाहेब देवढे यांनी उपस्थित मांन्यवरांचा सन्मान केला. ह.भ.प.मार्तंड महाराज तोगे यांनी ही आशिर्वाद दिले.वेदमंत्रोच्चारात होम,हवन,पंचारतीने महापुजा करण्यात आली. या प्रसंगी दशरथ डांगे,लक्ष्मण डांगे,तुकाराम देवढे,शाम दळे,विठ्ठल देवढे,किसन सातपुते, बाबासाहेब धुमाळ, अप्पासाहेब सातपुते, लक्ष्मण सातपुते, विक्रम डांगे,भानुदास भागवत,आदिनाथ सातपुते, शाम चन्ने, सिकंदर शेख यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते.( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here