पांढरीच्या पुलावर सहा वाहनांना चिरडणारा ट्रक पोलिसांनी रंगेहाथ पकडला, सोनई पोलिसांची कामगिरी

0

अहमदनगर (सुनिल नजन” चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा) संभाजीनगर -अहमदनगर रस्त्यावर पांढरीचा पूल येथे भरधाव वेगाने जाणारा आणि सहा वाहनांना चिरडणारा ट्रक नेवासा तालुक्यातील सोनई पोलिसांनी रंगेहाथ पकडला आहे परंतू ट्रक चालक मात्र फरार झालेला आहे. याबाबत ची घटना अशी की दि.29 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर – औरंगाबाद (संभाजीनगर) रस्त्यावर नेवासा तालुक्यातील पांढरी पुल येथे हाँटेल शिवनेरी जवळ अहमदनगर कडुन संभाजीनगर जाणाऱ्या ट्रक क्र.MH 16 CC 4343 या ट्रकने चार कार,एक टेंपो, एक दुचाकी असे एकूण सहा वाहनांना चिरडले. सदर वाहनांचा चुराडा झाला होता. अपघाता नंतर ट्रक चालक हा पुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हाँटेल निलकमल समोर ट्रक उभा करून पळून गेला आहे. त्याने पोलिसांत खबरही दिली नाही. आणि जखमींना कोणत्याही प्रकारची मदतही केली नाही. सदर ट्रक पोलीसांनी सोनई स्टेशनमध्ये जप्त केला आहे. या बाबत सोनई पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 329/2024 कलम 281,125अ,ब,324(4)(5),मोटार वाहन कायदा कलम184,134अ,ब,177,या प्रमाणे सायमा रज्जाक शेख वय(19) राहणार भानसहिवरे,तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर यांनी फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की पुप्पू रहिम शेख,प्रियंका अमोल वाघमारे, सोमय्या शकीर पठाण, राणी गणेश बोगळ,संगिता सागर गव्हाणे,ताई बाळासाहेब लोडगे,खातुनबी रहीम शेख,हासिना वजिद शेख,गया कदम,हे सर्व जण पुप्पू रशिद पठाण यांच्या मालकीच्या माळवी पिंपळगाव येथील शेतातील काम उरकून मारुती ईको कार.नं MH 14 JE 3401या गाडीने भानसहिवरे येथे जात असताना पांढरी पुल येथील शिवनेरी भेळ सेंटर जवळ ट्रक क्रमांक MH16 CC 4343 ने ईको कारला जोराची धडक मारून अपघातातील जखमींना कोणत्याही प्रकारची मदत न करता ईतर वाहनांनाही धडक मारीत अपघात करीत पुढे निघून गेला. पुढे दोन कि.मी.अंतरावर असलेल्या हाँटेल निलकमल समोर ट्रक सोडून पळून गेला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने सोनई पोलिसात कोणत्याही प्रकारची खबरही दिली नाही. अशा आशयाची फिर्याद सोनई पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.सदर ट्रक वर संत भगवान बाबा, संत वामनभाउ,चैतन्य मच्छिंद्रनाथ,चैतन्य कानिफनाथ अशी संतांची नावे लिहलेली आहेत.पोलिसांनी सदर ट्रक मालकाचे धागेदोरे लावण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.अपघात स्थळावर वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पोलीस सब ईनस्पेक्टर मेढे, अडकित्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर आणि शेवगाव विभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिस स्टेशनचे पोलीस हेड काँन्स्टेबल एम.आर.अडकित्ते हे करीत आहेत.पांढरीचा पुल येथे अपघाताची मालिका सुरुच आहे. तेथे कायम स्वरूपी महामार्ग पोलीस चौकी उभारणे ही काळाची गरज बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here