दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा” दुध भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करा!खासदार निलेश लंकेच्या तुतारीचा थेट लोकसभेत घणाघाती आवाज

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हाप्रतिनिधी) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके यांनी थेट लोकसभेच्या सभाग्रुहात महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडीत आवाज उठवला. खासदार लंके यांनी पिठासिन अधिकारी दिलिप सैफिया यांच्या कडे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सांगितले की सर्वात मोठ्या हक्काची दुध डेअरी महाराष्ट्रा बाहेर गेली. त्यामुळे दुग्ध व्यवसाय पोरका झाला आहे.दुध व्यवसायाला सहाय्य करणे गरजेचे आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधासाठी वाढीव निधी मिळणे गरजेचे आहे. दुधाला लिटरमागे बत्तीस रूपये भाव मिळतो आणि उत्पादन खर्च पंचावन्न रुपये आहे. हीच शेतकऱ्यांच्या दुखाःची खरी शोकांतिका आहे. दुध उत्पादकाची आर्थिक लुट थांबली पाहिजे. पशुखाद्याच्या किंमतीवर निर्बंध घातले पाहिजे. पशुखाद्याच्या गुणवत्ते बाबत तपासणी झाली पाहिजे. दुधाला आधारभूत किंमत ठरवून दिली पाहिजे.केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दुधप्रक्रिया उद्योग केंद्र उभे केले पाहिजे.दुध प्रक्रिया उद्योग केंद्रांना अनुदान द्या. दुग्ध विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या. पशुधनाच्या आरोग्यासाठी व रोग नियंत्रणासाठी वेटरनरी दवाखाने उभारणे अत्यंत गरजेचे आहे. खासदार निलेश लंकेच्या रुपाने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा थेट लोकसभेत मांडून सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न खासदार लंके यांनी केला आहे. संसदेच्या सभागृहात खा.लंकेनी पहिल्याच भाषणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मांडलेल्या समस्या हे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे फार मोठे यश आहे.तसेच दुधात भेसळ करणाऱ्या वर कठोरात कठोर कारवाई करण्याचीही मागणी लंके यांनी केली आहे. कारण भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांना कँन्सर सारखे आजार होत आहेत ही बाबही पिठासिन अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली आहे. बारामतीच्या खासदार संसद रत्न सुप्रिया सुळे यांनी खासदार निलेश लंके हे नवीन असल्याने त्यांना विषेश सहकार्य केले. “दिल्लीचेही तख्त हलवितो, महाराष्ट्र माझा” हे खासदार निलेशजी लंके यांनी संपूर्ण भारत देशासह उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here