अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजित जागर यात्रेतील रथाचे आमदार राजळेंच्या हस्ते कासार पिंपळगावात जोरदार स्वागत!

0

अहमदनगर (सुनिल नजन” चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हा) संपूर्ण देशातील बारा जोतीर्लींगाची मंदिरे बांधून हिंदु धर्माचा वारसा जतन करून ठेवणाऱ्या पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्ताने आयोजित जागरयात्रेतील रथाचे कासार पिंपळगावात आमदार राजळेंच्या हस्ते जोरदार स्वागत करण्यात आले. प्रारंभी ज्युनियर राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणातून डीजेच्या तालावर आणि पारंपरिक धनगरी ढोल ताशांच्या गजरात, न्रुत्याच्या तालावर अहिल्यादेवीच्या रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या जागरयात्रा रथाच्या मिरवणुकीत दादापाटील राजळे महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. मिरवणूक गावातील मुख्य चौकात येताच गावच्या सरपंच सौ मोनालीताई राजळे,आणि राष्ट्र सेवा समितीच्या जिल्हा शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. वैष्णवीताई कुलकर्णी , शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी अहिल्यादेवीच्या रथाचे पुजन करुन पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. अहिल्या देवीच्या रथावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण केली. मिरवणुकी नंतर गावातील हनुमान मंदिरासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वैष्णवीताई कुलकर्णी यांनी अहिल्यादेवीच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी अमोघ कुलकर्णी, सोमनाथ झाडे, संकेत पोटफोडे, संभाजी राजळे,सोपानराव तुपे, आनंद गांधी, प्रमोद राउत,गणेश पवळे,आदित्य फटांगडे,अक्षय नजन,ओंकार जगताप, दत्तात्रय दारकुंडे,मुरली नजन हे उपस्थित होते. खास धनगरी न्रुत्यासाठी दिंडेवाडीतील मंखळराव पांढरे आणि कोपरे येथील पोपटराव उघडे यांच्या झांज पथकाला पाचारण करण्यात आले होते. युवा नेते भाउसाहेब उघडे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने न्रुत्य संचलन केले.या पथकामध्ये शंकर उघडे, आदिनाथ पांढरे, शिवाजी उघडे,नाथा खरात यांच्या सह अनेक गावातील कलाकार सहभागी झाले होते. आदर्श ग्रामसेवक प्रमोद म्हस्के आणि ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे यांनी या जागरयात्रेचे योग्य रितीने नियोजन केले होते. सुत्रसंचालन विद्यार्थ्यीनी शिवाणी फटांगडे हीने तर आभार विद्यार्थी संकेत पोटफोडे यांनी मानले.ही जागरयात्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. ही जागरयात्रा ,बोधेगाव, शेवगाव, अमरापूर,कासार पिंपळगाव,तिसगाव, करंजी, कौडगाव,मेहेकरी मार्गाने अहिल्यानगरला पोहोचली.या जागरयात्रेचे संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here