अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हा) मी काकडेंच्या विकासकामाची चित्र फीत पाहुन भारावलो आहे.या निवडणुकीत हर्षदाताई काकडे यांना थेट विधानसभेत पाठवा असे आवाहन सिनेस्टार आणि नाम फौंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे यांनी केले. ते जनशक्ती मंचाच्या वतीने शेवगाव येथील खंडोबा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या वज्र निर्धार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अनासपुरे पुढे म्हणाले की काकडेकडे कोणत्याही प्रकारची मोठी सत्ता नसताना प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत जनतेच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या सौ हर्षदाताई काकडे यांचे काम पाहून मी थक्क झालो आहे.एवढी चांगली माणस पाण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांच्या वडीलापासुन हा संघर्ष सुरू आहे. कोविडच्या काळातही काकडेंचे काम उल्लेखनीय आहे.त्यांना आता येणाऱ्या निवडनुकीत थेट विधानसभेतच पाठवा आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा विकास कामाने कायापालट करा असे अनासपुरे यांनी सांगितले. सौ. हर्षदाताई काकडे यांनीही आजी माजी आमदारावर सडकून टीका केली.त्या म्हणाल्या की आलटून पालटून यांनी सत्ता भोगली आहे.त्यांनी सत्तेचा वापर फक्त आपला कारखाना वाचविणे आणि आपल्या बगलबच्यांचेच हीत जोपासने एवढ्या साठीच केलाआहे. सर्व सत्ता घरातच लागतात. जिल्हा बँक,जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमीटी,खरेदी विक्री संघ,आपल्या गावातील ग्रामपंचायत, या सर्व सत्ता हातात असताना यांना विकास का करता आला नाही.फक्त टक्केवारी साठीच यांना पदे लागतात असा आरोपही त्यांनी केला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेच परीवर्तन यात्रा घेऊन फिरत आहेत. प्रत्येक पक्ष यांनी वाटून घेतले आहेत. हे दहा मिनिटात पक्ष बदलतात. आमचे मिळालेले तिकीट आर्थिक घोडेबाजार करून यांनी चोरून नेले असे यांचे काम सुरू आहे. कोणत्याही लबाड पुढाऱ्याच्या भुलथापांना आणि दबावाला मी बळी पडणार नाही आणि या निवडणुकीतून माघार घेणारच नाही. पक्षाकडे तिकीट मागितले आहे पक्षाने तिकीट दिले तर ठीक नाही तर तुमच्या सर्व सामान्य जनतेच्या जिवावर मी ही निवडणूक लढवणार आहे. आणि जिंकूनही येणार आहे.असे सौ.काकडे यांनी निक्षून सांगितले. नाम फौंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे यांच्याकडे श्रीमती मंदाकिनी पुरनाळे यांनी 25 हजाराचा धनादेश सुपुर्त केला.काकडे यांनी निवडणूक लढविन्यासाठी निर्धार केला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. खंडोबा नगर परीसरात लोकांना जागा अपुरी पडली एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली होती. आणि काकडेंच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब केले. या निर्धार मेळाव्यातील गर्दीमुळे शेवगावातील सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अनेकांनी सांगितले की काकडे या फाँर्म भरतात आणि मागे काढून घेतात हा विरोधकांचा आरोप या निवडणुकीत खोडून काढून आणि आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. प्रारंभी दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. टप्पा क्र.2 ताजनापूर लिफ्ट मधील विकास कामात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विकास कामाच्या माध्यमातून तयार केलेले “पाउले सामर्थ्याची” या पुस्तकाचे प्रकाशन करून चित्रफीतीचेही मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी नारायण गर्जे, बबनराव माने,भाउसाहेब मडके, यांच्या सह जनशक्ती मंचचे अध्यक्ष अँडव्होकेट शिवाजीराव काकडे यांची भाषणे झाली.यावेळी जनशक्ती मंचचे महासचिव जगन्नाथ पाटील गावडे, मीनाताई मडके,सुनिता घुले, सुमनताई गावडे,ज्ञानेश्वर महाराज बटुळे,पवनकुमार साळवे, रामभाऊ साळवे, भाउसाहेब बोडखे,विनोद मोहिते, गोरक्ष कर्डिले, वैभव पुरणाळे,सुनिल गरुड, अनिल साबळे, सुभाष सबनीस, अशोक ढाकणे, बाळासाहेब कचरे,विनायक काटे, अल्ताफ शेख,सुनिल दारकुंडे,नवनाथ फुंदे, सुनिल काटे, रामराजे लाखे,संजय काकडे, रज्जाक शेख,भारत लांडे, संतोष राठोड, देविदास गिर्हे, राधाकृष्ण शिंदे, माणिक गर्जे, धाराभाउ राठोड, भगवान डावरे हे उपस्थित होते.महीलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संपूर्ण शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात काकडेच्याच उमेदवारी ची चर्चा सुरू झाली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन काकडेंनी निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे.म्हणजेच काकडेंना कोठून तरी राजकीय पाठबळ मिळाले असुन तिकिटा संदर्भात हिरवा कंदील मिळाला असल्याचे राजकीय निरिक्षकाचे मत आहे.
Home Breaking News काकडेंच्या विकासकामाची चित्रफीत पाहून मी भारावलो आहे, या निवडणुकीत हर्षदाताई काकडेंना थेट...