अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) शांतीब्रम्ह ही उपाधी मिळवलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नामवंत किर्तनकार वै.ह.भ.प.विष्णु महाराज शिंदे गुरुजी यांचा द्वितीय पुंण्यस्मरण सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापुर येथील शिरेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आळंदी येथे निवासी असलेले आणि विठ्ठल बाबा देशमुख यांच्या आश्रमात कार्यरत असलेले शिंदे गुरुजी यांचे परमशिष्य ह.भ.प.रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगेशास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून वै. शिंदे गुरुजी यांचे चरित्र कथन केले गेले. गुरुजींनी जिवनभर केलेल्या कार्याचा आढावा घेत घुगे महाराज यांनी गुरूजींच्या आठवणींना उजाळा दिला. आठवणी सांगत असताना सर्वांच्या अंतकरणाला स्पर्श करीत उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. घुगे शास्त्री यांनी सांगितले की शिंदे गुरुजी यांनी उत्तम भक्ती केली. काही लोक जिवंत असुन मेल्यासमान असतात तर काही जण जिवंत नाहीत पण ते आपल्यात आहेत त्यापैकी हे शिंदेगुरुजी आहेत. गुरुजींचा परमार्थ निष्कलंक होता. मानवी देहाची उत्पत्ती ही भक्ती आणि भजनासाठी झाली आहे. कितीही विपत्ती आली तरीही भजन सोडत नाहीत ते संत असतात. भक्ती वाढली की विरोधक वाढतात.आज दुसऱ्याच्या सुखाने अनेक मतलबी लोक दुख्खी आहेत.देहातून जिव निघून जाणे म्हणजे म्रुत्यु होय.अशा अनेक पैलूंना स्पर्श करीत घुगे शास्त्री यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गुरुजींचे चिरंजीव घनश्याम शिंदे यांनी दररोज रात्री पाच दिवस संत एकनाथ महाराज यांचे चरित्र कथन केले. घुगे शास्त्री यांच्या या पुण्यतिथी सोहळ्यातील किर्तना प्रसंगी ह.भ.प. सुदर्शन महाराज पालवे, शेलार मा.मा.,कल्याण शिंदे महाराज, जेष्ठ बंधू शिंदे गुरुजी, अरुण पुंड,तिसगावच्या श्रीराम,हनुमान मठाचे मठाधिपती रामदसी महाराज, यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यास आळंदी येथील संत महंत महाराजांची मांदियाळी शिरापुर येथे उपस्थित होती.प्रिती भोजना नंतर या सोहळ्याची सांगता झाली. पुढील वर्षी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा पुंण्यस्मरण सोहळा अतिशय मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
Home Breaking News शिरापुर येथे शांतीब्रम्ह वै.ह.भ.प.विष्णु महाराज शिंदे गुरुजी यांचा द्वितीय पुंण्यस्मरण सोहळा मोठ्या...