देवळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

0

मनमाड : आज देवळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने देवळा तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.केदा नाना आहेर हे होते.त्यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदा देवळा तालुका पत्रकार संघाचे कौतुक केले. नंतर त्यांनी पत्रकार हे समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यासाठी मी पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी राहिल असा शब्द दिला. तसेच पत्रकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच नाशिक ग्रामीण अधिक्षक मा.सचिन पाटील यांनी ही पत्रकारांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.तसेच सतत असेच काम करण्याचे पत्रकारांना सांगितले.यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.सचिन पाटील साहेब , भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.केदा नाना आहेर, देवळयाचे तहसीलदार मा.विजय सुर्यवंशी, दत्तात्रेय शेजवळ साहेब धान्य वितरण अधिकारी मालेगाव, पोलिस उपअधीक्षक कळवण अमोल गायकवाड, अधिक्षक देवळा ग्रामीण रूग्णालय मा. डॉ.श्री.गणेश कांबळे, देवळा पोलिस निरीक्षक मा.श्री. दिलीप लांडगे ,यशवंत पवार संस्थापक नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, विजय बनसोडे नायब तहसीलदार देवळा, सतिश बच्छाव गटशिक्षणाधिकारी देवळा , संदिप भोळे मुख्याधिकारी देवळा , सुधीर पाटील आरोग्य अधिकारी देवळा, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.तसेच देवळा तालुका पत्रकार संघाचे देवळा तालुका अध्यक्ष,उप अध्यक्ष, सर्व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नहिरे सर यांनी केले व आभार निकम सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here