दारु नको दुध प्या, अन् झाडांचा वाढदिवस साजरा करा,पुण्यातील व्यसनमुक्त युवक संघाचा कासारपिंपळगाव येथे उपक्रम साजरा

0

(अहमदनगर प्रतिनिधी) पुण्यातील बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखालील व्यसनमुक्त युवक संघाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे २०२२ या नव वर्षाच्या स्वागतासाठी दारु नको,दुध प्या, अन झाडे लाउन झाडाचा वाढदिवस साजरा करा हा उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.व्रुक्ष संवर्धन व स्वच्छता अभियाना अंतर्गत गेल्या २०२१ वर्षाला निरोप देताना हा उपक्रम राबविण्यात आला.पाथर्डीचे गटविकास अधिकारी जगदीश पालवे,सहाय्यक गटविकास अधिकारी दादासाहेब शेळके,विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,राजळे महाविद्यालयाचे प्राध्यापक विक्रमराव राजळेसर,अहमदनगरच्या न्यु आर्ट काँमर्स महाविद्यालयाचे स्मार्ट पीटीचे शिक्षक प्रा.उत्तमराव राजळेसर,डॉ. कांडेकर,निव्रुत्त मुख्याध्यापक रामदास म्हस्के सर यांच्या उपस्थितीत आणि ह.भ.प.दत्तात्रय महाराज राजळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला.प्रथम दीपप्रज्वलन, व्रुक्षारोपन,आणि लावलेल्या झाडाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा उपक्रम राबविण्यासाठी व्यसन मुक्त संघाचे संचालक सुखदेव म्हस्के यांनी विषेश परिश्रम घेत सर्व नियोजन केले होते. यावेळी कासार पिंपळगाव ग्रामपंचायत,राजळे महाविद्यालय, आणि व्यसन मुक्त युवकसंघ पुणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,अंकुश राजळे,प्रमोद म्हस्के, भाउसाहेब राजळे,आणि राजळे महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, आणि विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी संतोष लवांडे, तुकाराम कांबळे,अशोक तिजोरे सहसर्व ग्रामस्थमोठ्या संख्येने हजर होते.सर्वांना दुधाचे ग्लास देऊन गौरविण्यात आले. आणि दारूबंदीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात दिला गेला.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here