भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी नवरदेवाची आगळीवेगळी वरात

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे विषेश प्रतिनिधी, मो.9130040024) लग्नासाठी बाशिंग बांधून सजून धजून नवरदेवाचा रुबाबात असतो आपण हे सर्वत्र बघत असतो. लग्नपत्रिकेत नवरदेवाचे शिक्षण अवर्जून टाकले जाते. आपल्या देशात नवरीला घेण्यासाठी कधी हेलीकॉप्टर तर कधी विमान घेऊन गेल्याचे सर्वांनी बघितले किंवा ऐकले आहे. पण याच आपल्या देशासाठी सीमेवर थंडीवाऱ्यात, वादळात, हिमवर्षांवात, प्रसंगी उष्णतेच्या लाटेतही आपल्या देशाच्या सीमांचे रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या जवानाचा सन्मानासाठी डोंगरगाव येथील सी. आर. पी. एफ. जवान दर्शन (विरेंद्रसिंह) दरबारसिंह गिरासे हे बिहार येथे नक्षलवादी एरियात कार्यरत आहेत. यांनी आपल्या लग्न सोहळ्यात लग्नाच्या गाडीवर एक आगडी वेगळी सजावट केल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.जवानाने चक्क आपल्या वाहनावर नवरी घेण्यासाठी (लग्नासाठी) जात असताना आपल्या सजवलेल्या गाडीवर “लय असतात मनमौजी पण लाखात माझा एक फॊजी” नाव लावून गाडीच्या सजावटीत तिरंगे झेंडे व तोफची जीप वापरल्याने या गाडीने सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. सैनिकाचा रुबाब पुन्हा यावरून एकदा सिध्द केला आहे.सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील डोंगरगांव येथील सी. आर. पी. एफ. जवान दर्शन (विरेंद्रसिंह) दरबारसिंह गिरासे हे बिहार येथे नक्षलवादी एरियात कार्यरत आहेत. यांनी आपल्या लग्न सोहळ्यात लग्नाच्या गाडीवर एक आगडी वेगळी सजावट केल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. जवानाने चक्क आपल्या वाहनावर नवरी घेण्यासाठी (लग्नासाठी) जात असताना आपल्या सजवलेल्या गाडीवर “लय असतात मनमौजी पण लाखात माझा एक फॊजी” नाव लावून गाडीच्या सजावटीत तिरंगे झेंडे व तोफची जीप वापरल्याने या गाडीने सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे.जवानाचे सोमवारी (दि. २७) रोजी शहादा तालुक्यातील टेंभे येथील मुलीसोबत लग्नविवाह संपन्न झाला. शहादा तालुक्यातील टेंभे येथे मुलीकडे विवाह असल्याने नवरदेव ज्या वाहनावर जाणार त्याची देखील सजावट करण्यात आली होती. मात्र या वाहनावर केलेल्या सजावटीमुळे सर्वत्र नवरदेव जवानाचे कौतुक केले जात आहे. टिव्ही वर किंवा बातम्यांमध्ये सर्वांनी नवरदेव लग्नासाठी चक्कर हेलीकॉप्टर व विमानाने जाऊन त्यात नवरी मुलीला आणल्याचे आपण बघितले आहे. पण डोंगरगांव येथील जवानाने नवरदेवाच्या गाडीवर आगडी वेगडी सजावट केल्याने सैनिकासह शहादा तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्राफिक्स डिसाईनर निलेश राजपूत यांनी केलेल्या वाहनाच्या सजावटीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.विवाह सोहळा म्‍हटला म्‍हणजे प्रत्‍येक ठिकाणी काही वेगळे पाहण्यास मिळते. कधी वरांची मिरवणूक, तर कधी स्‍टेजचे डेकोरेशन पाहण्यासारखे असते. विशेष म्‍हणजे लग्‍न सोहळा आटोपल्‍यानंतर वाहनावर “दुल्‍हन हम ले जाऐंगे” असे नेहमीच पाहण्यास मिळते. पण शहादा तालुक्‍यातील डोंगरगाव येथील वराने नेलेल्‍या वाहनावर एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नवरदेव ज्या वाहनावर जाणार त्याची सजावट करण्यात आली. मात्र या वाहनावर भाजपा युवा मोर्चा शहादा तालुका अध्यक्ष व शहादा तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्राफिक्स डिजाईनर निलेश राजपूत यांनी केलेल्या सजावट आगळीवेगळी व लक्षवेधक ठरली. शहादा तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्राफिक्स डिझाईनर निलेश राजपूत यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांचा सन्मानासाठी उच्च शिक्षित तरुण भूषण सोलंकी यांच्या विवाहात भागायतदार शेतकरी राजा याची आगडी वेगडी सजावट केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here