साकेगावच्या पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशिय प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन

0

(अहमदनगर प्रतिनिधी)सुनिल नजन अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशिय प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ डिसेंबर२०२१ ते २ जानेवारी २०२२ या काळात हा सोहळा संपन्न होत आहे. ह.भ.प.मोहन महाराज आंबे यांच्या वाणीतून नवनाथ ग्रंथाचे वाचन होत आहे.हभ.प.रणमले,चन्ने,डांगे,दिंडे,सोनवणे,दिवटे,भिसेईत्यादी महाराजांची प्रवचने तर ह.भ.प.योगेश दुधाळ,शिवाजी चन्ने,वैष्णवी शिंदे,रामदास खेडकर, विकास औटी,रामदास गर्जे,ह.भ.प.ब्रम्हनिष्ठ मार्तंड महाराज तोगे यांची किर्तने होणार आहेत. दि.१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत गजानन महाराज संस्थानचे संचालक ह.भ.प.अर्जुन महाराज यांच्या हस्ते नवनाथ पारायण सांगता, होम, हवन,आणि भुमिपुजन सोहळा संपन्न होणार आहे.दि.२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते११ या वेळेत पांगरा येथील विठ्ठल गडाचे महंत ह.भ.प.रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन महाप्रसादाने या सोहळ्याची समाप्ती होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.तोगे महाराज यांनी केले आहे. साकेगाव ते पाडळी रोडवरील बिरोबा देवस्थान जवळ हा सोहळा संपन्न होत आहे. तरी भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यास सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here