उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१ ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ या दिवाळी अंकाला जाहीर

0

राज्य :  स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, डाकेवाडी, तालुका – पाटण, जिल्हा – सातारा यांच्या वतीने दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी कवितासागर द्वारा मुद्रित आणि प्रकाशित ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ या दिवाळी अंकाची सन्माननीय परीक्षकांनी २०२१ या वर्षाच्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी, यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी तसेच दिवाळीच्या फराळाबरोबर वाचकांना सकस साहित्याची मेजवानी देणार्‍या दिवाळी अंकांचा, साहित्याचा गौरव व्हावा यासाठी स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला असून यापुढेही अशाच प्रकारचे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करून साहित्यसेवा करावी अशी अपेक्षा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांनी व्यक्त केली.‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ हा ५३८ पृष्ठांचा विशेषांक असून ज्यामध्ये एकही जाहिरात नाही हे विशेष. उत्कृष्ट मांडणी आणि बांधणी असलेला तसेच उत्तम दर्जा असलेला दिवाळी अंक आहे. आतील छपाई खूप सुंदर आहे. संपादकांचे छंद प्रेम आणि वाचन प्रेम यातून प्रकर्षाने जाणवते. इतररांप्रती करत असलेल्या कष्टाची जाणीवही यातून दिसते. वाचनप्रेमासाठी संपादक स्वत: राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या निमित्ताने जगभरातील वाचकांच्यासमोर आली. त्यांच्या प्रेटेक उपक्रमाला एक वेगळी उंची आहे. आज डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात कवितासागर च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. या दिवाळी अंकातून अनेक छंदवेड्या व्यक्तींना प्रेरणा मिळाली असून या दिवाळी अंकाचे हे निर्भेळ यश आहे. शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी कराड, जिल्हा सातारा येथे होणार्‍या कार्यक्रमात सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ चे मुद्रक, प्रकाशक आणि मुख्यसंपादक डॉ. सुनील दादा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here