केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भारत सरकार मौजे केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक नवीन शाखा सुरू करावे

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे -तिर्थ क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान (ब दर्जा) केळगाव येथे हजारे भाविक भक्त महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून येतात. व भाविक भक्तांना राष्ट्रीय कृत बँके अभावी गैरसोय होत आहे व गावात बाजारपेठ असून, गावात कापड दुकान, मेडिकल, हॉस्पिटल, इलेक्ट्रॉनिक दुकान, कृषी सेवा केंद्र, व भुसार खरेदीकेंद्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणत व्यापारी वर्ग आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अद्रक, मिरची, व इतर भाजीपाला विक्री केली जाते. तसेच केळगाव मुर्डेश्वरला लागून आधारवाडी, आधारवाडी तांडा, कोन्हाळा, कोन्हाळा तांडा, सिरसाळा, सिरसाळा तांडा, पिंपळगाव घाट इत्यादी गावांचा संपर्क असून या ठिकाणी गावकरी येतात. यामुळे बाजारपेठेत लाखोची उलाढाल आहे. याचा विचार करता याठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकशाखा आवश्यक आहे.निवेदन देताना भारतीय जनता पार्टी सिल्लोड उपाध्यक्ष विकास साहेबराव मुळे व पञकार राजु आप्पा हिंगमिरे . रमेश गायकवाड .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here