रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न.

0

मुंबई-लालबाग-परेल : रंगकर्मी शिलेदार आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा नुकतीच गोदरेज मैदान, करिरोड , मुंबई १२ येथे संपन्न झाली. या क्रिकेट स्पर्धेत अनेक रंगकर्मी, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलावंत यांनी सहभाग घेतला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे त्रस्त झालेल्या आणि आपला आनंद हरपणाऱ्या सर्व कलावंतांना पुन्हा एकदा नव्या जोषात आणि उत्साही वातावरणात एकत्र आणण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचबरोबर भविष्यात त्यांच्यासाठी विधायक कार्यप्रणाली अंमलात आणून त्यांची आर्थिक बाजू बळकट करण्याचा रंगकर्मी शिलेदारांंचा एकमेव उद्देश असून या उद्देशसफल पुर्ततेसाठी हे रंगकर्मी शिलेदार कायम त्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली. या स्पर्धा सोहळ्यात शरद पोंक्षे (अभिनेता), अनिल कोकीळ (नगरसेवक), महेश्वर तेटांबे (सिने नाट्य दिग्दर्शक-पत्रकार), संजय (नाना) आंबोले (मुंबई जिल्हा उपाध्यक्ष-भाजपा), हरी पाटणकर (निर्माता-स्मित हरी प्रॉडक्शन), राकेश शेळके शितल माने (संचालक-राशी स्टुडिओ), माधुरी मांजरेकर (जिल्हा नियोजन समिती-मुंबई शहर), राज पार्टे (चिटणीस-महाराष्ट्र राज्य म. न. का. सेना), किरण तावडे, किरण काकडे (नृत्य दिग्दर्शक), स्मितेश केळूस्कर (शितल कैटरर्स), नवल मंत्री इत्यादी मान्यवरांनी सर्वतोपरी सहकार्याची महत्वाची कामगिरी बजावली आहे. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम विजयी ठरलेल्या आमरे वारियर्स आणि अंतिम पराभूत ठरलेल्या भावकादेवी प्रॉडक्शन या दोन्ही संघांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे हसत खेळत आणि उत्साही वातावरणात रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीगचा क्रिकेट सोहळा संपन्न झाला.( धन्यवाद
९०८२२९३८६७ रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग (पर्व ३ रे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here