सहकारी संस्थेचा कायदा

0

मुंबई : सहकारी संस्थेचा कायदा ( सदर क्रमांक:-030)जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७- ग्राहक साक्षरता अभियान – विषय: मी एका सोसायटीत राहतो. सदर सोसायटीच्या इमारतीच्या शेजारी काही झाडांची वाढ होऊन माझ्या घरातील विजेच्या तारा त्यामुळे तुटल्या आहेत. उद्यान विभागाला कळवून झाडे काढण्याबाबत विनंती केली व सोसायटीने नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव केला;परंतु आजपर्यंत मला नुकसान भरपाई मिळाली नाही, तरी याबाबत काय करावे?

उत्तर: झाडांची छाटणीबाबत सर्व अधिकार महापालिकेला, उद्यान विभागाला आहेत. त्याप्रमाणे जर झाडांमुळे वीजपुरवठा खंडित होत असेल व धोका निर्माण होत असेल, तर झाडे छाटून टाकण्याची परवानगी मागता येते. तशी परवानगी दिली असेल, तर उद्यान विभागाच्या मदतीने कार्यवाही करता येते. सोसायटी जर भाडेकरू मालकी हक्क पद्धतीची असेल, तर अशा बाबतीत सुद्धा महापालिकेकडून कार्यवाही करता येऊ शकते; परंतु आपल्या शेजारील प्लॉटमधील सभासद हरकत घेत आहे असे दिसते. तर त्याबाबत सोसायटीत ठराव करून सोसायटीच्या सचिवांना विनंती करून सदर प्लॉटमध्ये जाता येऊ शकतील व वृक्षांची छाटणी करता येऊ शकेल. या करिता पोट नियमांमध्ये स्पष्ट तरतुदी आहेत.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.

श्री जगदीश काशीकर हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या दाेन महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल काेहारे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here