बेस्टची कै राजेश कदम स्मृती आंतर आगार एकांकिका स्पर्धा नुकतीच संपन्न..

0

मुंबई : बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने दि. १३ व १४ डिसेंबर २०२१ रोजी दामोदर नाट्यगृह परळ येथे बेस्टचे दिवंगत कलावंत कै. राजेश कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेली दोन वर्ष शासकीय निर्बंधांमुळे होऊ न शकलेली स्पर्धा यावर्षी होणार असल्याने सर्व कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या स्पर्धेत बेस्टच्या विविध आगारातील एकूण ११ गट सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाटककार संभाजी सावंत आणि नाट्य तसेच एकांकिका लेखक विजय टाकळे यांनी काम पाहिले.सुप्रसिद्ध अभिनेता विजय पाटकर, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ आणि राजेश हाटले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी, बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य, माजी जनता संपर्क अधिकारी रवींद्र आवटी, निवृत्त उपमुख्य व्यवस्थापक (आं.ले.प.) विजय कदम, बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या कला विभागाचे माजी सभापती अरविंद मुळे, माजी उप सरचिटणीस सुबोध (भाई) महाले, माजी मानद सचिव (संगीत) शाहीर आप्पा(मधुकर) खामकर, प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद पवार, पत्रकार राज चिंचणकर तसेच मंडळाच्या कला विभागाचे सभापती डॉ.राजेंद्र पाटसुते, क्रीडा विभागाचे सभापती धनंजय पवार यांच्यासह उपक्रमातील अधिकारी श्रीमती चं.रा.जगदाळे, महेंद्र साळवे, विनोद आडे, विजय खोले, विनायक शिंदे, गडांकुश, दिंडोशी आगार व्यवस्थापक शंकर वाघ, राहुल रणदिवे, विजय सूर्यवंशी, संध्या पुरव, सुदास सावंत, रुपेश पाडावे, विनोद मगर, मृणाल ठाकूरदेसाई आणि बेस्टची सुप्रसिध्द अभिनेत्री माधवी जुवेकर व कवयित्री प्रतिभा सराफ ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. बेस्ट मधून सेवानिवृत्त झालेले यशवंत कोकितकर, अरुण शेलार, उदय दरेकर, नंदू सावंत, हेमंत अधटराव, राज जैतपाल, विश्वनाथ तावडे, गजानन चव्हाण, कांचन मेस्त्री हे कलाकारही स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानद सचिव उदय हाटले यांच्यासह विजय कोळवणकर, महेंद्र भांबिड, चारुदत्त वैद्य, यतीन पिंपळे, पांडुरंग दाभोळकर, प्रशांत सावंत, दीपक कारेमोरे, संजय चौधरी, संदीप खराडे, अभय चव्हाण, भूषण मेहेर, शेखर कवळे, अशोक सांगळे, श्याम शिंदे, सुनील खोबरेकर, विकास परब, दिलीप लिगम, संदीप गायकवाड, किरण राऊळ, अर्जुन गावडे, सुशिर नांदलसकर, राहुल परमार, चंद्रशेखर मोहिते, संतोष दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे वृत्तनिवेदक संदेश नाईक यांनी केले तर सुनील ताम्हणकर आणि वासुदेव आंब्रे यांनी स्पर्धकांची रंगभूषा केली.
निकाल पुढील प्रमाणे…
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम
“स्लाइस ऑफ लाईफ”
(यंत्र उप विभाग, दादर कार्यशाळा),
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय
“ट्युलिप” (परिवहन अभियांत्रिकी, प्रतीक्षा नगर आगार ), सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय “सेक्स” (इमारत विभाग- ओशिवरा आणि तिकीट व रोख विभाग, वांद्रे आगार),
सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम योगेश शिंदे, सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय घनश्याम परकाळे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम सचिन म्हात्रे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय आनंदा कुंभार, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम भालचंद्र म्हात्रे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय चारुदत्त वैद्य, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम प्रशांत सावंत, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय सुशील शिर्के, सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम सुचिता राणे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम सचिन म्हात्रे, सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय अभिनय भोसले, सर्वोत्कृष्ट अभिनेता तृतीय गणेश मिंडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम अनुप्रिता मांगले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय ममता शेडगे, सर्वोत्कृष्ट हरहुन्नरी कलाकार “अक्षय पदमाने”.अभिनय उत्तेजनार्थ…
चंद्रकांत जाधव, राजकुमार सावंत, प्रदीप सुर्वे, ऐश्वर्या सकरे, स्मिता साबळे, अंबादास माने, शृंखला डोंगरे, तीर्था टिकम, चंद्रकांत सावंत, प्रमोद सुर्वे.आपल्या अत्यंत जिव्हाळ्याची आणि बहुप्रतिक्षित असलेली ही स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here