महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात कोणी अडकवन्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत: ना.प्राजक्त तनपुरे

0

अहमदनगर प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात कोणी अडकवन्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू कोणावरही अंन्याय होउदेणार नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी, नगरविकास, उर्जा राज्य मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी केले.ते तिसगाव येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी भाजपच्या माजी आमदाराचे नाव न घेता आमदारावर जोरदार टीकाश्र सोडले. भाजपच्या आजी माजी आमदाराच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात जेष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्या वर अत्यंत खालच्या पातळीवर जाउन विरोधकांनी टीका केली होती त्या टीकेचा खरपुस समाचार घेताना ना. तनपुरे यांनी विरोधकांना वरील सनसनीत इशारा दिला आहे. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे माजी पाथर्डी तालुका प्रमुख रफिक शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,अमोल वाघ,सुरेश वाघ,ईलियास शेख,रामदास गोल्हार, हे उपस्थित होते.नंतर शिरापुर,करडवाडी येथे ना.तनपुरे यांनी जनता दरबारात जनतेच्या अनेक समस्या दूर करून दिलासा दिला. या दौऱ्यात सुधाकर वांढेकर, नितीन लोमटे,तिसगावचे विद्यमान सरपंच काशिनाथ पाटील लवांडे,शिवसेना संघटक राजेंद्र म्हस्के,मारुती लवांडे, कल्याण लवांडे, सुनिल लवांडे, संजय पाटील लवांडे, करडवाडीचे अर्जुन बुधवंत,बाळासाहेब गर्जे, विजय राठोड, विजया आव्हाड, अनिल रांधवणे,हवालदार आर एस अमोलिक, पोलीस काँ.बी.एस.ससाणे, पोलीस काँ.विनोद कुदनर, चालक पोलीस काँ.योगेश बोरुडे यांच्या चोख बंदोबस्तासह अनेक गावचे नेते उपस्थित होते.( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here