आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना सुवर्णसंधी.

0

मुंबई-दादर – प्रतिनिधी: आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांना आपल्या चित्रपटांचे हक्क विविध नामांकित चॅनेला विकण्याची संधी उपल्ब्ध करुन देत आहोत.तसेच ज्या निर्मात्यांना आपले चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्याची संधी मिळणार आहे या परिषदे मध्ये विविध चॅनेलचे हेड, विविध कंपनी, मालक, सिंगल थिएटर्सचे तसेच शासकीय मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. मराठी चित्रपट खरेदी विक्री व वितरण परिषद १९ जानेवारी २०२२ मुंबई येथे आयोजित करण्यांत येणार आहे. ज्या निर्मात्यांना या परिषदेत आपल्या चित्रपटाची विक्री अथवा वितरण करावयाचे आहे. असा निर्मात्यांनी आजच आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या २/७ ,मोहन नाईक को-आॅप हाैसिंग सोसायटी,व्ही.वाय.दहिवलकर बुवा मार्ग,नायगांव,दादर,मुंबइ -४०००१४, या मुंबई
कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष, संस्थापक श्री.देवेंद्र मोरे यांनी केले आहे.( धन्यवाद श्री.देवेंद्र मोरे,संस्थापक/अध्यक्ष
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here