3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा संपन्न.

0

मुंबई : 3 स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पुरंदरे मैदान, नायगाव , दादर पूर्व येथे संपन्न झालेल्या CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये अनेक मराठी अभिनेते, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांनी एकही रुपया मानधन न घेता केवळ जनसेवा म्हणुन सहभाग दर्शविला होता. शिवाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात येणार असून या लीग मध्ये प्रामुख्याने विजय पाटकर, अंगद म्हसकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वाढवे, महेश्वर तेटांबे, प्रणव रावराणे, ओम जंगम, महेश कोकाटे, आनंद मयेकर, जयवंत वाडकर, सनीभूषण मुणगेकर, सचिन पाताडे, सुरेश डाळे, अनिकेत केळकर ह्यांसारखे एकाहून एक कलाकार मंडळी खेळली गेले. ज्या ज्या संस्था लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात अश्या लाभार्थी संस्थांना CCDL चे आयोजक श्री.संचित यादव, श्री. अमर पारखे , श्री. राकेश शेळके, सौ.शितल माने शेळके तसेच सचिन मोहिते, संदीप मोहिते, संदेश मोहिते, पूर्णिमा वाव्हळ ह्यां तर्फे ही मदत दिली जाणार असून त्या पैकी नमस्ते फाउंडेशन, फॅमिली होम, तर्पण फाउंडेशन, मंगेश भगत प्रतिष्ठान ह्या संस्था आहेत. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सनी मुणगेकर आणि अनिकेत केळकर यांच्या ऑस्ट्रिक या अंतिम विजेत्या संघास आणि विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांच्या ईगल या अंतिम पराभूत संघास आकर्षक ट्रॉफी प्रदान करून उत्साही वातावरणात CCDL सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग सोहळा संपन्न झाला.( धन्यवाद ९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here