महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त माळवाडी येथील रक्तदान शिबिरात 123 त्यांनी रक्तदान केले

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ,मो.9130040024 )
28 नोव्हेंबर रविवारी माळवाडी तालुका देवळा येथे महात्मा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली . सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री .योगेश आबा आहेर .श्री सुनील आहेर,प्रा . आबासाहेब नारायण देवरे . डॉ . निलेश जेजुरकर ,डॉ. अविनाश गोरे
डॉ. प्रशांत खैरनार,वृक्षमित्र श्री . बळवंत त्रंबक बागुल श्री .शांताराम धर्मा बागुल .सरपंच सौ .उषाताई शेवाळे .
सरपंच श्री . शिवाजी बागुल . जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी ,डॉ . शिवाजी लहाडे यांनी दीपप्रज्वलन करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमापूजन करण्यात आले . सदर कार्यक्रमास माळवाडी व फुलेमाळवाडी गावातील नागरिकांनी एकत्र जमून महात्मा फुले यांना अभिवादन केले . त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात व्याख्याते डॉ . प्रदीप जायभावे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी आजचे सामाजिक शिक्षण यांच्यावर अतिशय मार्मिक असे व्याख्यान दिले . तसेच दोन्ही गावातील असणारे शिक्षक यांना आमंत्रित करून खरा शिक्षक दिन साजरा करण्यात आला . तसेच शिक्षकांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा , पुष्पगुच्छ , सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले .तसेच कोव्हिडंच्या धकाधकीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून उदार होऊन न दिसणाऱ्या कोरोना विषाणूच्या मुकाबला करून रुग्णांना सेवा दिली व अंत्यविधी कार्यक्रमात सहभाग घेतला . मदत करून सहभाग घेतला अशा सर्व covid-19 त्यांना सन्मानित करण्यात आले . त्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा , शाल , पुष्पगुच्छ देऊन कौतुकाची थाप पाठीवरती दिली .रक्तदान शिबिर गावातील नागरिकांना व महात्मा फुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या फुले प्रेमींनी माळवाडी येऊन तब्बल 123 रक्तदात्यांनी रक्तदान केले . प्रत्येक रक्तदात्याला ” सार्वजनिक सत्यधर्म ” हा ग्रंथ भेट देण्यात आला . सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले कला क्रीडा मंडळ माळवाडी , फुलेमाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व आयोजकांनी एक दिलाने कामकाज करून गावाकडे आदर्श निर्माण केला .मंडळाचे सचिव श्री. जयराम सोनवणे यांनी 52 व्या वेळेस रक्तदान करून आदर्श निर्माण केला . मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बागुल . उपाध्यक्ष लक्ष्मण बच्छाव. कार्याध्यक्ष श्री .नामदेव बागुल ,श्री प्रशांत शेवाळे , श्री . दीपक शेवाळे श्री . यशवंत जाधव श्री संजय शेवाळे श्री दिलीप आदमे , श्री .सुनील बच्छाव . किरण आहिरे . हेमंत बागुल पंकज बागुल विशेष परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here