आमठाणा येथे भाजप पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

0

सिल्लोड (  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा सर्कल मधील आमठाणा चौफुली येथे महाविकस आघाडी सरकार व महावितरण कंपनी च्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडी सरकारच्या व महावितरण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता कृषिपंप वीज कनेक्शन खंडित केली सद्याच्या स्थितीत पिंके पाण्यावर आहेत शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरबरा मका,पिकाची लागवड केलेली आहे परंतु या गरजेच्या वेळी महाविकास सरकारकडून कृषिपंप तोडणी सुरू आहे शेतकऱ्यांचे अतिदृष्टी मुळे आर्थिक नुकसान झाले आहे पाण्याअभावी पिके वाळत आहेत आम्ही आमच्या शेतकरी बांधवांचे नुकसान सहन करणार नाही पूर्वसूचना देऊन बिलात सवलत देण आवश्यकता आहे असे न करता वीज खंडित करणे हे शेतकऱ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पणे उभा आहे असे आपल्या भाषणात पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी वीज कनेक्शन खंडित करणे थांबवण्यात यावे या आशयाचे निवेदन तहसीलदार विक्रम राजपूत,महावितरण इंजिनिअर सतिष गवळी यांना देण्यात आले यावेळी माजी सभापती अशोक गरूड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव दानेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन चौधरी, सरपंच अरुण मोरे, रामचंद्र मोरे, सुभाष लोखंडे,काकासाहेब मोरे, अनिल खरात पोपट कुंटे देविदास आमटे रामचंद्र मोरे सुभाष लोखंडे तुळशिराम मोरे माधुराव सोमासे रंगनाथ कदम शेवंतराव मोरे विकास मोरे व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते,आमठाणा ता सिल्लोड आमठाणा येथे महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांची कृषिपंप वीज कनेक्शन खंडित केलेली सुरू करण्यात यावी यासाठी माजी सभापती अशोक गरूड दिलीपराव दानेकर, सचिन चौधरी यांनी मा तहसीलदार विक्रम राजपूत, इंजिनिअर सतिष गवळी यांना निवेदन देण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here